नारायणगाव । जागतिकीकरणात नाविन्यता आवश्यक आहे. जागतिकीकरणात टिकण्यासाठी तंत्रज्ञान समजून घेणे महत्वाचे आहे. यामुळे पुढील काळात देशाचा विकास वेगाने होणार आहे, असे मत अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. बी. खेडकर यांनी व्यक्त केले. जुन्नर तालुक्यातील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे मा. बाळासाहेब जाधव महाविद्यालय व बीसीयुडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रिसेंट ट्रेंन्डस इन कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंट या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. खेडकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बागलपुर विद्यापीठाचे वाणिज्य विभागाचे डीन डॉ. पवनकुमार पोद्दार यांनी मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. सुभाष वाडेकर यांनी महाविद्यालयातील संशोधन प्रकल्प व विकास यांची माहिती दिली आणि परिषदेचे समन्वयक प्रा. योगेश माने यांनी परिषदेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी संजय वाकचौरे, प्रा. शशिकांत वाळुंज, प्रा. मनिषा गिरी, डॉ. मनोहर कानवडे, डॉ. सविता रहांगडाळे, डॉ. रमेश भिसे, प्रा. रावसाहेब गरड, डॉ. अनिल उगले, डॉ. सुधीर तांबे, डॉ. जे. पी. भोसले आदींसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
संशोधनपत्रिकेचे प्रकाशन
वडॉ.गौर गोपाल बनिक, डॉ. श्रीलता पालेकर, डॉ. डी. एम. गुजराथी, अॅड. एस. बी. आवटे, सीए अभिषेक आपट, सीए सचिन ढेरंगे, डॉ. के. एस. निकम, डॉ. रतिकांत रॉय, डॉ. एच. एम. जरे या तज्ज्ञांनी उपस्थित प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित अनेक संशोधक प्राध्यपकांनी आपले संशोधन निबंध सादर करत मार्गदर्शन केले. या परिषदेचे उद्घाटन डॉ. ई. बी. खेडकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व संशोधनपत्रिकेचे प्रकाशन करून झाले. विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) मान्यताप्राप्त पत्रिकेत 82 संशोधन निबंध प्रसिद्ध झाले आहेत.
परिषद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न
ही परिषद यशस्वी होण्यासाठी महाविद्यालाचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, फॅकल्टी इन्चार्ज, प्रा. योगेश माने, प्रा. शरिफ चौगुले, प्रा. निलिमा पाटील, प्रा. नितीन मोरे, प्रा. रमेश कोल्हे, प्रा. सोनाली काळे, प्रा. श्रद्धा जाधव, प्रा. प्रियांका गाडेकर, प्रा. सोनाली भागवत, प्रा. धनराज आहेर, प्रा. अशफाक पटेल तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष परिश्रम व सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन मोरे यांनी तर पाहुण्यांची ओळख प्रा. शरिफ चौगुले यांनी करून दिली. परिषद समन्वयक प्रा. मनिषा गिरी यांनी आभार मानले.