ग्लासगो । रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती पी वी सिंधू, जागतिक स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेती सायना नेहवाल आणि पुरूष एकेरीतील देशातील आघाडीचा बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांतर यांच्यावर 21 ते 27 ऑगस्ट दरम्यान रंगणार्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून देण्याची जबाबदारी असेल.
भारतीय बॅडमिंटनपटूंनी या वर्षी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकाचा दुष्काळ यावेळी संपुष्टात येईल अशी आशा बाळगली जात आहे. जागतिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत एक रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकली आहेत. पण, एकदाही भारताला सुवर्णपदक मिळवता आलेले नाही. पुरूए एकेरीत एक कांस्यपदक, महिला एकेरीत एक रौप्यपदक आणि दोन कांस्यपदके आणि महिला दुहेरीत भारताने एक कांस्यपदक भारताने जिंकले आहे.