जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

नवापूर । जागतिक आदिवासी दिना 9 ऑगस्टनिमित्त नवापूर तालुका आदिवासी उत्सव समितीतर्फे नवापूर शहरात विविध व भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासुन भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन शिरीष नाईक नगर पालिकेचे गटनेते गिरिष गावीत,पंचायत समितीचे उपसभापती दिलीप गावीत,यांनी झेंडी देऊन शुभारंभ करण्यात आला.

आज शोभायात्रेसह संस्कृती दर्शन
यावेळी उत्सव समितीचे आर. सी. गावीत,विनय गावीत,भालचंद्र गावीत,सुनील वसावे,जालमसिंग गावीत,राँबीन नाईक,विनायक गावीत,ईश्वर गावीत,जैनु गावीत,संजय गावीत,अजय गावीत,डाँ भानुदास गावीत,ईश्वर मावची,डि एन मावची,संजय मावची,रमेश गावीत,अजय गावीत,कुणाल गावीत, आदी उपस्थित होते. मोटार सायकल रॅली लाईट बाजार,डॉ बाबासाहेब पुतळा रोड,साईमंदीर रोड,मंगलदास पार्क जनता पार्क,शास्त्री नगर,स्वामी विवेकांनंद चौक,देवळफळी,यामार्गाने फिरुन माजी जिल्हापरिषद अध्यक्षा स्व. हेमाताई वळवी यांचा पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. आज बुधवार 9 रोजी शहरातुन भव्य शोभा यात्रा व संस्कृती दर्शन यासह वरिष्ठ महाविद्यालय येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.