जागतिक आदिवासी दिन : पारंपरिक वेशभूषांसह भव्य रॅलींनी वेधले लक्ष

0

यावलसह फैजपूर व रावेर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन : आदिवासींच्या नृत्याने फिटले डोळ्यांचे पारणे

भुसावळ- जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून भुसावळ विभागातील भुसावळसह यावल, फैजपूर व रावेर येथे आदिवासींनी काढलेल्या भव्य रॅलींनी नागरीकांचे लक्ष वेधले. आदिवासी संस्कृतीचे यानिमित्त दर्शन घडले तर आदिवासी नृत्याने नागरीकांच्या डोळ्यांचे पारणेही फिटले.

यावलला आदिवासी नृत्यांनी मिळवली दाद
यावल- आदिवासी दिनानिमित्ताने जिल्हाभरातील आदिवासी यावल येथे दाखल झाले. आदिवासी विकास कार्यालय ते फैजपुर रस्त्यावरील नेवे मंगल कार्यालयापर्यंत आदिवासींनी पारंपारीक ढोल, ताश्यांच्या गजरात व पारंपारीक वेषभुषेत रॅली काढण्यात आली. सुमारे एक किलोमीटर अंतराच्या या रॅलीत आदिवासी नृत्याने शहरवासीयांच्या डोळयांचे पारणे फिटले. सुरुवातीस क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्यासह थोर पुरूषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीत आमदार हरीभाऊ जावळे, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार कुंदन हिरे, लोकसंघर्षच्या नेत्या प्रतिभा शिंदे, आदिवासी प्रकल्पस्तरीय अध्यक्षा मीना तडवी, भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हा परीषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

रॅलीतून घडले संस्कृतीचे दर्शन
आदिवासी संस्कृतीचे दर्शन भव्य रॅलीतून घडले. जिल्ह्यासह तालुक्यातील अतीदुर्गम भागातील जामन्या, गाडर्‍या, लंगडाआंबा, उसमळी या आदिवासी गावासह तालुक्यातील सर्व आदिवासी गावांमधून आदिवासी बांधवानी येथे हजेरी लावली. सकाळपासूनच आदिवासी बांधवाचे शहरात आगमन होण्यास सुरवात झाली. महाराष्ट्र बंदमुळे एस.टी.बसेस बंद असतानाही आदिवासी अगदी वेळेवर शहरात पोहचले. आदिवासी कार्यालयात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन होवून आदिवासी महिला, पुरूष यांचे आदिवासी नृत्य झाले त्यानंतर रॅलीव्दारे नेवे मंगल कार्यालयात आल्यांनतर सभेत रुपांतर झाले. आदिवासी वेषभूषा, तीर कामठा, विविध धातुचे शस्त्रे हातात घेवून आदिवासींनी केलेल्या नृत्यामुळे शहरवासीयांची मने जिंकली. पुर्णवाद नगरातील एम.बी.तडवी यांच्या निवासस्थानासमोर क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन तहसीलदार कुंदन हिरे यांच्या हस्ते झाले. तडवी वसाहतीतही प्रतिमेचे पुजन झाले. आदिवासी कोळी समाजाच्या वतीनेही रॅलीचे शहरातून सजीव देखाव्यासह रॅलीचे आयोजन करण्यात आले.

आदिवासी कच्चे हिरे, आकार देण्याचे काम सुरू -आमदार
सातपुड्याच्या वनात दर्‍या खोर्‍यात आदिवासी कच्चे हिरे आहेत त्यांना शैक्षणिक सुविधा देवून आकार देण्याचे काम प्रशासन करीत आहे व या कामातुन आज अनेक आदिवासी हिरे समाजाला प्रकाश देत आहेत. उपलब्ध शैक्षणिक सुविधेचा व येणार्‍या प्रत्येक प्रसंगास तोंड देण्याची क्षमता आदिवासींमध्ये आहे. नैराश्यात कुणीही आत्महत्या केलेली नाही तेव्हा प्रत्येक बाका प्रसंग कसा पेलायचा याचे उत्तम उदाहरण आदिवासी समाजाचे देता येईल, असे प्रतिपादन आमदार हरिभाऊ जावळे यांनी येथे केले. ते आदिवासी दिनानिमित्त शहरातील नेवे मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या नेवे मंगल कार्यालयात आदिवासी अस्मिता दिनाचा समारोप कार्यक्रम पार पडला अध्यक्षस्थानी प्रकल्प स्तरीय नियोजन समिती अध्यक्ष मीना तडवी होत्या.

यांची होती उपस्थिती
मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष नजमा तडवी, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, जिल्हा परीषद गटनेता प्रभाकर सोनवणे, पंचायत समिती गटनेता दीपक पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य हर्षल पाटील, तहसीलदार कुंदन हिरे, नगरसेवका नौशाद तडवी, डॉ.श्रीधर साळुंके, किरण तडवी, डॉ.चंद्रकांत बारेला, जितेेंद्र सपकाळे, रमजान तडवी, राजु तडवी, एम.बी.तडवी, अतुल भालेराव, संजय गांधी योजना समिती चेअरमन विलास चौधरी, उजैन्नसिंग राजपूत, आसाराम कोळी, संदीप सोनवणे, प्रकल्प अधिकारी आर. बी.हिवाळे सह मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील करण्यात आला. प्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन देखील केले. सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी तर आभार सुनील चौधरी यांनी मानले. उपस्थितांचे बुकेऐवजी वृक्ष रोप देवून स्वागत करण्यात आले.

फैजपूर शहरात भव्य रॅली
फैजपूर- फैजपूर येथील आदिवासी तडवी भिल्ल समाजातर्फे शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. तडवी वाडा येथून न्हावी दरवाजामार्गे खुशालभाऊ रोड अशी रॅली काढण्यात आली. सुभाष चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण अर्पण करून रॅली फैजपूर पालिकेत रॅलीचा समारोप झाला. पालिका सभागृहात आदिवासी जनक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सहाययक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनगराध्यक्ष कलीम खां मन्यार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, इंजिनियर राजू तडवी, नगरसेवक रशीद तडवी यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आदिवासी कृती समितीचे युनूस तडवी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार समीर तडवी यांनी मानले.

यांनी घेतले परीश्रम
या रॅली व कार्यक्रमाला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नजीर नूरखा तडवी, अरमान सुभान तडवी, तमीज दगडू तडवी, महंमद रसूल तडवी, नगरसेवक रशीद तडवी, राजू इंजिनियर, पत्रकार समीर तडवी, पत्रकार राजू तडवी, अरमान रज्जाक तडवी, फत्तु बाबु तडवी, फिरोज सायबु तडवी, मलक आबीद सर सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान, फैजपूर येथील तडवी भिल्ल समाजासह युनूस तडवी, दस्तगीर तडवी तडवी यांच्यासह फैजपूरीयन ग्रुप, आदिवासी तडवी भिल्ल कृती समितीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीला आसेम संस्थापक अध्यक्ष राजू तडवी व आसेम पदाधिकार्‍यांनी भेट दिली. यावेळी फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामलाल साठे, होमगार्ड समादेशक विक्की कोल्हे , सहाययक फौजदार हेमंत सांगळे, विजय मालविया यांच्यासह पोलिस व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त राखला.

आदिवासींच्या भल्यासाठी काम करणार -अनिल चौधरी
रावेर- आदिवासी क्रांती विकासाचे जनक बिरसा मुंडारसारखी जनसेवा करा, त्यांनी केलेली समाज सेवाच दैवरूपी होती त्यांनी आदिवासी तांड्यावरचा आदिवासी समाज एकत्र करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला. समाज संघटनाने मोठा परीवार तयार केला, समाजसेवा सर्वश्रेष्ठचा संदेश बिरसा मुंडा यांनी दिला. त्यांचा आदर्श समोर ठेवून आदिवासी समाजाचे भले करण्यासाठी काम करणार असल्याचे आदिवासी तडवी भिल्ल विकास मंचतर्फे आयोजीत जागतिक आदिवासी क्रांती दिनानिमित्त कार्यक्रमात भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले. रावेर तालुका आदिवासी भिल्ल तडवी विकास मंचतर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त छोरीया मार्केटपासून आदिवासी वाद्यांवर नृत्य करीत रॅली काढण्यात आली. या रॅलीत आदिवासी वेशभूषा परीधान केलेले आदिवासी बांधव सहभागी होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येवून माजी सैनिक हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमात रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, गटविकास अधिकारी हबीब तडवी, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य अहमद तडवी, आदिवासी वस्तीगृहाच्या गृहपाल उषा वळवी, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष शेख कुर्बान, कैलास परदेशी, खुदाबक्ष तडवी, दिलीप कांबळे, दिलीप तायडे, बाळू शिरतुरे, नूर मोहम्मद तडवी, कुसुंबा सरपंच सलीम तडवी, हिलाल सोनवणे, जुम्मा तडवी, अयुब तडवी, फत्तु तडवी, जिल्हा उपाध्यक्ष नूर मोहम्मद, तालुकाध्यक्ष नसीर तडवी, सरफराज तडवी, अब्बास तडवी, भिकारी तडवी, गफ्फार तडवी, राजू तडवी यांच्यासह बहुसंख्य आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.