चाळीसगाव । तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव अंतर्गत भारत सरकारच्या विशेष मिशन इंद्रधनुष्य अभियान अंतर्गत तळेगाव अंगणवाडी क्र.1 मध्ये लसीकरण सत्राचे पर्यवेक्षणासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे निरिक्षक डॉ.अझर रहिल यांनी बुधवार 8 डिसेंबर 2017 रोजी भेट दिली. विशेष मिशन इंद्रधनुष्य अभियानामुळे 100 टक्के लसीकरण पुर्णत्वाचे ध्येय गाठण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आशा, अंगणवाडी सेविका व लोकसहभागदेखील महत्वाचा आहे. त्यामुळे लोकांमध्ये याची जनजागृती करून प्रत्येक बालकाचे पुर्ण लसीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रसंगी त्यांनी तळेगाव आरोग्य केंद्राला भेट दिली असता, आरोग्य केंद्राचा स्वच्छ परिसर व अंतर्गत इमारतीच्या प्रसन्न वातावरणाचे कौतुक केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे व कर्मचारी यांच्या माध्यमातून तळेगाव आरोग्य केंदाचा कायापालट झाल्याचे नमुद केले. मला एवढे छान आरोग्य केंद्र प्रथमच पाहायला मिळाले असे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.सोनवणे यांनी डॉ.रहिल यांचा सत्कार केला. आरोग्य सहाय्यिका सौ.सुनंदा महाजन, औषधनिर्माण अधिकारी राजू पाटील, आरोग्य सेविका सौ.परदेशी, आरोग्यसेवक विजय देशमुख, सुनिल मोरे, शंकर मोरे, गटप्रवर्तक सौ.ज्योत्स्ना शेलार, सौ.बंडगर आदी उपस्थित होते.