फैजपूर। येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात 18 महाराष्ट्र बटालियन जळगाव व महविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने 22 रोजी जागतिक जल दिवस उत्साहात साजरा झाला. शहरीकरण, जंगलतोड आणि निसर्गामधील अवाजवी मानवी हस्तक्षे यांमुळे जलचक्रात अनियमितता येत असून मानवासमोर भिषण समस्या म्हूणन जलसमस्या उभी ठाकली आहे.
भारतीय स्तरावर एनसीसीने जलजागृतीचा उपक्रम हाती घेतला असून बटालियन पातळीवर 18 महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल दिलीप पांडे यांच्या आदेशान्वये शाळा व महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाला या अभियानात सामील करुन घेतले जात आहे. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय शैक्षणिक उपक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमांतही हिरीरीने सहभाग नोंदवत असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी यांच्या प्रोत्साहनामुळे राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे लेफ्ट. राजेंद्र राजपूत यांनी दृकश्राव्य साधनांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची भिषणता व त्यावरील उपाययोजना यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदशर्क्षन केले. यात कॅडेटस्चा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गेला.
विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
विद्यार्थ्यांना त्यांच्या परीने उपाययोजना सुचविल्या आणि अंमलात आणण्याची शपथ घेतली. याप्रसंगी महाविद्यालय परिसरातील जलस्त्रोतांची साफसफाई करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी, उपप्राचार्य प्रा. ए.जी. सरोदे, उपप्राचार्य डॉ. ए.आय. भंगाळे, उपप्राचार्य डॉ. डी.बी. तायडे, उपप्राचार्य उदय जगताप, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम मोरे, आसिफ शहा, विनायक कोळी, महेश पाटील, सागर महाले, भुषण तायडे, अजय अडकमोल, अक्षय अडकमोल, अमोल तायडे, चंद्रकांंत सपकाळे आदींनी परिश्रम घेतले.