पॅरिस । जागतिक टेनिस क्रमवारीत अँडी मरे पहिल्या स्थानी विराजमान असून स्पेनचा स्टार खेळाडू रॅफेल नदालची घसरण झाली आहे. नदाल पहिल्या पाचातून बाहेर पडला आहे. त्याउलट जपानचा केई निशिकोरी पहिल्या पाचात आला आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत निशिकोरीचे स्थान दोनने सुधारले असून, तो पाचव्या स्थानावर आला आहे. रॅफेल नदालची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.
अँडी मरे अव्वल स्थानावर कायम आहे. निशिकोरीने या आठवड्यात होणार्या माँटे कार्लो मास्टर्स स्पर्धेतून माघार घेतली असून, नदाल या स्पर्धेत दहाव्या विजेतेपदासाठी प्रयत्नशील असेल. अँडी मरे पहिल्या स्थानावर असून जोकोविच दुसर्या तर स्टॅन वाव्रींका तिसर्या स्थानी आला आहे. चौथ्या स्थानी रॉजर फेडरर पाचव्या केई निशिकोरी तर सहाव्या स्थानी मिलोस राओनिचने मजल मारली आहे. नदाल सातव्या तर मरिन चिलीच आठव्या
स्थानी आहे.