जागतिक टेनिस क्रमवारीत मरेचे अव्वल स्थान कायम

0

लंडन : ब्रिटनचा स्टार खेळाडू अँडी मरे याने पुरुष एकेरीतील जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले. नुकतीच नवी मानांकन यादी जाहीर केली. मरे गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर रोजी सर्वप्रथम अव्वल स्थानावर आला होता. तेव्हापासून त्याने अव्वल स्थान राखले आहे. सर्बियाचा नोव्हाक जोकोविच दुसऱ्या आणि स्वित्झर्लंडचा स्टॅन वावरिंका तिसऱ्या स्थानावर आहे. बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनचे स्थान एकने उंचावले असून, तो प्रथमच पहिल्या दहामध्ये आला आहे. मिलोस राओनिच चौथ्या, केई निशिकोरी पाचव्या आणि रॅफन नदाल सहाव्या स्थानावर आहे. मोसमातील पहिली ऑस्ट्रेलियन ग्रॅंड स्लॅम जिंकणारा फेडरर मात्र नवव्या स्थानावर आहे.

फेडररची आठ स्थानाची प्रगती
पुरुषांच्या क्रमवारीत मरे 11,540 गुणासह अव्वलस्थानी आहे. धडाकेबाज मरेने आपल्या कामगिरीच्या बळावर हे स्थान टिकवून ठेवण्यात यश मिळविले आहे. ज्योकोव्हिकचे 9825 गुण असून 5695 गुणासह वावरिंका तिसऱ्या स्थानी आहे. कॅनडाचा रेऑनिक चौथ्या, जपानचा निशीकोरी पाचव्या स्थानी विराजमान आहे. तसेच नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळवणाऱ्या रॉजर फेडररने तब्बल आठ स्थानाची प्रगती करताना नववे स्थान पटकावले आहे. तसेच स्पेनच्या राफेल नादालने आपले सहावे स्थान कायम राखले आहे.

सेरेना अग्रस्थानी कायम
महिलांच्या डब्ल्युटीए क्रमवारीत अमेरिकन सेरेना विल्यम्स 7780 गुणासह अग्रस्थानी कायम आहे. जर्मनीची अँजेलिक केर्बर 7115 गुणासह दुसऱया तर झेक प्रजासत्ताकची प्लिसकेवा 5270 गुणासह तिसऱया स्थानी आहे. सिमोन हॅलेप, डॉमनिक सिबुलकोव्हा व रॅडवेन्स्का अनुक्रमे चौथ्या, पाचव्या व सहाव्या स्थानी आहेत. तसेच स्पेनची गार्बाइन मुगुरुझा सातव्या स्थानी, रशियाची स्वेतलाना कुझनेत्सोवा आठव्या, रशियाची मेडिसन की नवव्या तर ब्रिटनची जोहाना कोंटा दहाव्या स्थानी आहे.