जागतिक तांत्रिक क्रांतिचा उद्गाता,’मार्क झुकेरबर्ग’

0

सुनील आढाव,पुणे-

   प्रश्‍न हा आहे की, लोकांना आपल्याबद्दल काय माहिती हवी आहे यापेक्षा लोक आपल्याबद्दल काय माहिती देऊ शकतात हाच उद्देश समोर ठेऊन फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकची निर्मिती केली. 2004 साली सोशल मीडियाच्या क्रांतीला सुरुवात करून फेसबुकद्वारे जगाच्या कानाकोपर्‍यातील प्रत्येक व्यक्तीला असे व्यासपीठ तयार केले. ज्यामुळे परस्परांशी जगभरातील लोक संपर्क ठेवू लागले. ‘जग एक खेडे’ हीच ती संकल्पना सत्यात येऊ लागली. लोकांना परस्परांच्या संपर्कात राहण्याचे हे एक महत्त्वपूर्ण माध्यम बनावे म्हणून झुकेरबर्ग यांनी हे पाऊल उचलले. आणि पुढे फेसबुकच्या ऐतिहासिक यशानंतर 2007 साली झुकेरबर्ग यांनी अधिकृतरीत्या फेसबुकची घोषणा केली. त्याचवेळी ते अरबपती बनले. त्यावेळी ते फक्त 23 वर्षांचे होते. आपल्या अविरत मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे सर्व शक्य केले होते. मार्क यांच्या आश्‍वासक वाटचालीवर टाकलेला प्रकाशझोत…

सन्मित्रहो, फेसबुकचा उद्गाता मार्क झुकेरबर्ग यांचा जन्म 14 मे 1984 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील व्हाईट प्लेन या शहरात झाला. त्यांचे वडील एडवर्ड झुकेरबर्ग हे व्यवसायाने दंतचिकित्सक आहेत. घराशेजारीत त्यांचे क्लिनिक आहे. तर त्यांची आई करेन एडवर्ड झुकेरबर्ग मिनोरुग्ण चिकित्सक आहे. झुकेरबर्ग यांनी ‘फेसबुक इंक कॉर्पोरेशन कंपनी स्थापन केली. ज्याद्वारे सोशल नेटवर्कींग वेबसाईट ‘फेसबुक’चे ऑपरेटींग केले जाते. समाजातील प्रत्येक सातवा व्यक्ती फेसबुकशी संलग्न झाला आहे. फेसबुक चालवणार्‍यांशी संख्या 1 अरबपेक्षाही जास्त झाली आहे. दर महिन्याला 700 अरब पेक्षा जास्त लोक आपला वेळ फेसबुकवर घालवतात.

जीवनात धोका पत्करने हा यशस्वी होण्याचा एकमेव खात्रीशीर फंडा आहे. हे झुकेरबर्गने हेरले होते. त्यांनी आपल्या जीवनात कधीच नोकरीसाठी लालची स्वभावाला तोंड वर काढू दिले नाही. 17 व्या वर्षी मित्रांसोबत एक सिनेप्स मीडिया प्लेअर बनविले. ज्याद्वारे वापरकर्त्यांच्या आवडीची गाणी स्टोर करता येत होती. हल्लीच्या मुलांमध्ये सर्वात जास्त भिती गणित आणि फिजिक्सची असते. मात्र झुकेरबर्ग गणित आणि फिजिक्सचे दिवाणे होते. त्यांनी माध्यमिक शाळेत शिकताना अनेक पुरस्कार मिळविले होते.

शालेय शिक्षण घेतानाच मार्क झुकेरबर्ग हे कम्प्युटर प्रोग्रॅम लिहायला लागले होते. यासाठी त्यांचे वडिल त्यांची मदत करत असत. कालांतराने झुकेरबर्ग यांना घरी कम्प्युटर शिकण्यासाठी कम्प्युटर शिक्षकांना बोलवले. त्यामुळे संगणकाचे ज्ञान झुकेरबर्ग यांना घरीच मिळू लागले.

बालपणापासूनच झुकेरबर्ग अभ्यासात एवढे हुशार होते की, आपल्या शाळेतील संगणक शिक्षकांनाही ते असे काही प्रश्‍न विचारायचे की, त्यामुळे शिक्षकही हैराण होत असत. झुकेरबर्गच्या प्रश्‍नांपुढे शिक्षकही नापास ठरत होते.

झुकेरबर्ग यांचे वडील डेन्टल क्लिनिक चालवायचे. मार्क यांना वयाच्या 12 व्या वर्षापासूनच संगणकासोबत मैत्री झाली होती. प्रोग्रॅमिंग डेव्हलपमेंटमध्ये रुची असलेले झुकेरबर्ग यांची चाणाक्ष बुद्धी पाहून त्यांचे वडील एडवर्ड झुकेरबर्ग यांनी त्यांना ‘सी-प्लसप्लस’ हे पुस्तक भेट दिले होते. त्यानंतर झुकेरबर्ग यांनी  ‘झुकनेट’ नामक मॅसेजिंग प्रोग्राम बनविला. ज्यामुळे क्लिनिकचा संगणक घरच्या संगणकाशी जोडला गेला. त्यामुळे क्लिनिकमधून या प्रोग्रामद्वारे त्यांची रिसेप्सनिस्ट एडवर्ड यांना पेशन्टची माहिती देत असत. किती पेशन्ट आहेत. कोण नवीन आले आहे. याची इत्यंभूत माहिती झुकनेट मॅसेन्जरने दिली जात असत.

शाळेत असताना आजकालची मुले ही मोबाईलमध्ये व्यस्त असतात. मात्र झुकेरबर्ग यांनी आपल्या मित्रांसाठी व्हिडिओ गेमची निर्मिती केली. ज्यामुळे मित्रांमध्ये ते प्रोग्रामिंग एक्सपर्ट म्हणून सुप्रसिद्ध होते.

जेव्हा मार्क झुकेरबर्ग यांनी हावर्ड युनिवर्सिटीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा शिक्षण घेत असताना कोर्समॅच नावाचा एक सॉफ्टवेअर बनविला होता. ज्याच्या सहाय्याने विद्यार्थी आपल्या आवडीनुसार कोर्स निवडत असत.

मार्क झुकेरबर्गची बुद्धी एवढी तल्लख होती की, जेव्हा ते कॉलेजमध्ये होते तेव्हा सर्वात लोकप्रिय आणि उच्च सिक्युरिटी असलेली कॉलेजची वेबसाईट हॅक करून कॉलेजच्या फेसबुक नावाच्या पुस्तकावरून फेसमॅश नावाची वेबसाईट बनविली. ज्यामध्ये कॉलेजच्या मुलींचे फोटो अपडेट केले जात होते. फेसमॅश ही वेबसाईट कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती.
19 साव्या वर्षी पहिल्यांदाच झुकेरबर्ग यांनी ‘दी फेसबुक’ या वेबसाईटचा प्रारंभ केला. ही वेबसाईट हावर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एवढी प्रसिद्ध झाली की, खूप कमी कालावधीत लोकप्रिय ठरू लागली. कालांतराने ही वेबसाईट फेसबुकच्या नावाने संपूर्ण दुनियेत सुप्रसिद्ध झाली. आता तर गुगलनंतर ‘फेसबुक’च लोकप्रिय झाले आहे.

24 मे 2007 रोजी मार्क झुकेरबर्ग यांनी पहिल्यांदा अधिकृत आणि सार्वजनिकरित्या फेसबुकची घोषणा केली. संपूर्ण जगाला एकाच व्यासपीठावर आणण्याचे त्यांचे स्वप्नही साकारल्याने त्यांनी त्यांचा या पाठीमागचा उदात्त हेतू स्पष्ट केला. जगामध्ये लोक दुसर्‍यांबद्दल बोलतात मात्र फेसबुकच्या माध्यमातून जगाला आपण स्वतःच आपल्याबद्दल सांगू शकतो.
2007 नंतर फेसबुक मार्केटमध्ये अस्तित्वात आल्यानंतर झुकेरबर्गला असे वाटू लागले की, त्याची वेबसाईट बॅकफूटला जात आहे. त्यानंतर त्याने आशिया, भारताकडे आपला कल वळविला. आशियामध्ये हैदराबादमध्ये त्याने आपले कार्यालय उघडले. त्यानंतर त्याने यशाच्या एक नाही अनेक पायर्‍या पादाक्रांंत केल्या. त्यानंतर जगातील एक नंबरची सोशल नेटवर्किंग साईट म्हणून फेसबुककडे बघितले जाऊ लागले. 2012 साली फेसबुकचे मूल्य शेअर मार्केटमध्ये 104 बिलिअन झाले होते.
मार्क झुकेरबर्गच्या फेसबुकची लोकप्रियतेने प्रभावित होऊन 2010 साली ‘दी सोशल नेटवर्क’ नावाचा एक चित्रपट बनला गेला. ज्यामध्ये मार्क झुकेरबर्गच्या यशाचा आलेख आणि त्याचा यशस्वी जीवनप्रवास दाखविण्यात आला आहे.

झुकेरबर्ग एक उत्तम प्रोग्रॅमर बरोबरच एक उत्तम व्यावसायिक व्यक्ती म्हणूनही प्रसिद्ध आहेत. 2012 साली मोबाईलवर फोटो शेअरिंगची वेबसाईट ‘इन्स्टाग्राम’ 1 बिलिअन डॉलर्सला विकत घेतली. त्यानंतर 2014 साली ऑक्युलस रिफ्ट त्यानंतर जगातील सर्वात वेगाने प्रसार करणारे मोबार्ईल मॅसेंजर अ‍ॅप्स व्हाट्स अ‍ॅप हे 22 बिलियन्स डॉलर मध्ये खरिदी केले. जी आजपर्यंतची सर्वात मोठी डिल आहे. ज्यामुळे बडे-बडे उद्योजकही आश्‍चर्यचकित झाले.

हल्ली तर फेसबुकने नवीन नवीन प्रयोग करायला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये आपल्या फोटोवरून किंवा आपल्या नावावरून योग्य अर्थ सांगून आपल्या भविष्याचा वेध घेतला जात आहे. आणि आपल्या भविष्याचे भाकित केले जात आहे. मग तो झुक्या असो वा आणखी कोणी. प्रत्येकाच्या नावावरून अर्थ सांगितला जात आहे. अनेकजणांना या प्रयोगाची भुरळ पडत आहे.