मॉर्डन हेल्थकेअर : मेडीकल व्हॅल्यू ट्रॅव्हल चर्चासत्र – डॉ. प्रदीप कुमार व्यास
मुंबई :- पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांची उत्तम दर्जाची कार्यक्षमता, भांडवल, कार्यशक्ती असल्याने भारत हे भविष्यात जागतिक दर्जाचे रोगाचे निदान करणारा देश ठरत आहे. शहर ते ग्रामीण भागातील आरोग्य सेवा जोडण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत. सर्व रूग्णालयाची माहिती एकाच व्यासपीठावर देश तसेच विदेशातील नागरिकांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप कुमार व्यास यांनी सांगितले.
सेवा क्षेत्राविषयक जागतिक प्रदर्शनात आधुनिक आरोग्य निगा- मेडिकल व्हॅल्यु ट्रॅव्हल या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ व्यास बोलत होते.डॉ. व्यास म्हणाले, विदेशातून येणाऱ्या रूग्णांना रोगाचे निदान कोणत्या रूग्णालयात होते. त्यासाठीचे वैद्यकीय शुल्क किती या सर्वाची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. राज्यातील रूग्णालय अधिक कार्यक्षम असणे यासाठी त्यांवर नियमात्मक बंधणे असणार आहेत.
विविध देशातून लोक भारतात रोगाचे निदान करण्यासाठी येतात. अॅलोपॅथी, होमियोपॅथी , युनानची केंद्रे आहेत. महाराष्टात 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. 25 खासगी महाविद्यालये आहेत. शहर ते ग्रामिण भागात सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल ते प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. शासनातर्फे विविध विमा योजना आणि आरोग्यदायी योजना राबविल्या जात आहेत. विमा योजनेअंतर्गत 1.5 करोड पेक्षा जास्त लाभार्थी आहेत. बालकांच्या मृत्युचे प्रमाण घटत असून, आदिवासी आणि अल्पसंख्यांकासाठीही शासन योजना राबवित आहे. असे सांगत डॉ. व्यास म्हणाले, काही वर्षापूर्वी मोठ्या रोगाचे निदान फक्त विदेशात व्हायचे, पण ही परिस्थिती बदलली असून महाराष्ट्राकडेही आरोग्याच्या निदान करणाऱ्या सुविधा असून कार्यक्षम वैद्यकीय अधिकारी आहेत. यामुळे महाराष्ट्र लवकरच जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र बनणार आहे.वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे म्हणाले, वर्षाला 60 हजार डॉक्टर्स तयार होत आहेत. प्रत्येक डॉक्टर, नर्स, लॅब टेक्नीशियन्स यांचे पॅरामेडीकल कौन्सील ऑफ स्टेट सोबत नोंदणी बंधनकारक आहे. विदेशातील रूग्णांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी अनेक नियम बंधनकारक आहेत.
पद्मश्री रमाकांत देशपांडे म्हणाले, भारतात उत्तम वैद्यकीय सुविधा बरोबरच तज्ज्ञ सर्जन आहेत. इतर देशापेक्षा भारतात कमी दरात रोगाचे निदान केले जाते. त्याचबरोबर कमी वेळात उपचार केले जातात. जवळजवळ 4 मिलीयन रूग्ण आरोग्याचे निदान करण्यासाठी भारताची निवड करतात. कार्यक्रमास आयुर्वेद हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव वासुदेवन, कौशल्य विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई. रविंद्रन, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. अनुप वाधवान यांच्यासह विविध देशाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.