भुसावळ। जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने स्व. पुरुषोत्तम चौधरी नेत्रदान, देहदान मार्गदर्शन केंद्र किन्ही व इंडियन मेडिकल असोसिएशन महिला शाखेच्या संयुक्त विद्यमाने सहकार नगरातील आयएमए सभागृहात नेत्रदान संकल्प नोंदणी करण्यात आली. यावेळी नेत्रदानाविषयी माहिती देवून इच्छुकांनी नेत्रदान संकल्प पत्रके भरुन दिल्यानंतर त्यांना त्वरीत बाफना नेत्रपेढीतर्फे नेत्रदान संकल्प नोंदणी कार्ड व माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.
यशस्वीतेसाठी यांनी केले सहकार्य
याप्रसंगी डॉ. जितेंद्र फिरके, डॉ. अर्चना खानापूरकर, डॉ. मंगेश खानापूरकर, डॉ. सुषमा खानापूरकर, डॉ. उमेश खानापूरकर यांना बाफना नेत्रपेढीतर्फे नेत्रदान नोंदणी कार्ड देण्यात आले. याप्रसंगी नेत्रदूत सुरेंद्र चौधरी, योगेंद्र भिरुड, संजिव पाटील, मिलिंद भारंबे, समाजसेविका शैलजा सावंत यांचे सहकार्य लाभले.