सावदा (प्रतिनिधी) – सावदा नगरपरिषदेच्या वतीने आज दिनांक 5 जून जागतिक पर्यावरण दिन शहरामध्ये साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून न.प.मराठी शाळा येथे वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री किशोर अशोकराव चव्हाण, मा.प्रा.व. पू होले सर साहित्यिक व विचारवंत, कार्यालय अधिक्षक श्री सचिन चोळके, अंतर्गत लेखा परीक्षक श्रीमती भारती पाटील, लिपिक हमीद तडवी, प्रा. अनिल नेमाडे सर, वृक्ष प्रेमी किरण गुरव, वृक्ष प्रेमी बुद्धभूषण बगाडे,, अरुणा चौधरी, आकाश तायडे, व इतर वृक्षप्रेमी उपस्थित होते.