जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम

0

भुसावळ । शहरातील शांतीनगर परिसरात असलेल्या सोमेश्‍वर नगर भागात पर्यावरण दिनानिमित्त महिलांनी हिरव्या साड्या परिधान करुन परिसरात वृक्षारोपण केले. तसेच घरोघरी जावून वृक्षांचे वाटप करण्यात आले. यामध्ये निंब, वड, चिंच, आंबा, पळस अशी रोपटे देण्यात आली. कोळी समाज जिल्हाध्यक्ष रुपाली सुर्यवंशी यांनी पर्यावरणाचे महत्व नागरिकांना सांगितले.

राजीव गांधी वाचनालय
नसरवानजी फाईलमधील राजीव गांधी वाचनालयात जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी परिसरात पाच झाडे लावण्यात येवून ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ असा संदेश देण्यात आला. माजी आमदार निळकंठ फालक यांनी पर्यावरणाचे महत्व सांगितले. जिल्हाध्यक्ष मो. मुनव्वर खान, जिल्हा उपाध्यक्ष जे.बी. कोटेचा, राजेंद्र पटेल, फकरुद्दीन बोहरी, डॉ. नईम मजहर, सलिम गवळी, जगपालसिंग गिल, यु.एल. जाधव, चंद्रसिंग चौधरी, विवेक नरवाडे, गोविंदा पाटील उपस्थित होते.

वृक्षारोपणास यांची होती उपस्थिती
यावेळी जनाबाई चौधरी, पौर्णिमा वारके, प्रतिभा वारके, मंगला चौधरी, सगुना पाटील, योगिता पाटील उपस्थित होते.