जागतिक पोलीस गेम 2017

0

अलिबाग – अमेरिका येथे पार पडलेल्या जागतिक पोलीस गेम 2017 च्या अॅथलेटिक्समध्ये मुंबई पोलीस दलाच्या सोनिया मोकल हिने 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे. सोनिया ही अलिबाग तालुक्यातील हाशिवरे गावची रहिवासी आहे. या विजयामुळे महाराष्ट्र पोलीस दलाची मान परदेशात उंचावली आहे. सोनियाच्या या खडतर प्रवासात तिच्या आई-बाबांचा मोलाचा वाटा असल्याचे तिने सांगितले आहे.

2013 साली मुंबई पोलीस दलात सहभागी झालेल्या सोनिया मोकल नायगाव पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर आहेत. नुकत्याच झालेल्या पोलीस क्रीडा स्पर्धेत त्यांनी ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांची जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. अमेरिकेत पार पडलेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेत राज्याला सुवर्ण पदक मिळवून देण्याच्या हेतूने पोलीस कॉन्स्टेबल सोनिया मोकल यांनी प्रशिक्षक साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमांगी बंगा यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली होती. अमेरिकेत झालेल्या 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल तिच्या हाशिवरे गावी मोठा जल्लोष करण्यात आला. सोनियाच्या या यशाने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

धेय्यवेड्या सोनियाने उरी बागळगलेले स्वप्न सत्यात आनण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. एकीकडे आपला महाविद्यालयीन आभ्यास पुर्ण करीत आपला छंद हि तिने जोपासला. गेले चार दिवस अंगात ताप असून हि कोणतीही पर्वा न करीता आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करीत ती देशाचा नाव उंचविण्यासाठी प्रयत्न करीत होती. आणी आज तिचे स्वप्न पुर्ण झाल्याने आम्हाला अत्यांनद होत असल्याची प्रतिक्रीया तिच्या वडीलांनी दिली.