वरणगाव। शहरातील आयुध निर्माणीतील सी.ई. विभागातील कर्मचारी व चित्रकार आंनद मोरे यांची जागतिक चित्र प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. 11 ते 30 ऑगस्ट दरम्यान नेदरलॅन्ड या देशात चित्रप्रदर्शन भरणार असून दिल्ली येथील इंटरनॅशनल अॅमी नेट मॉर्डन आर्ट या संस्थेने देशभरातून 40 चित्रकारांची निवड केली आहे.
आनंद मोरे यांना बालपणापासूनच चित्रकलेची आवड असून त्यांनी याच क्षेत्रात बी.एल.ए. शिक्षण घेतलेले आहे. त्यांना आतापर्यंत चित्रकलेत 12 पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर मिळालेले असून जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये झालेल्या चित्रप्रदर्शनात त्यांची पेटींग 65 हजार रुपयात विकली गेली होती. त्यांना ऑन टायटल या पेटींगची आवड असून कंगवापेटींग ते उत्कृष्ठ करतात. या यशाबद्दल त्यांचे आयुध निर्माणी बोर्डाचे अध्यक्ष ए.सी. वाजपेयी व महाप्रबंधक एस.चटर्जी यांनी अभिनंदन केले. बौध्द विहारात त्यांचा सत्कार करण्यात आला.