जळगाव । येथील डॉ. उल्हास पाटील फिजीओथेरेपी महाविद्यालयात जागतिक फिजीओथेरेपी डे निमीत्त यावेळी रूग्णांना डॉ वर्षा पाटील,श्रीमती गोदावरी पाटील, सुभाषदादा पाटील यांच्या हस्ते वॉकर,कुबडी, पायाचा पटटा इ साहित्य वाटप करण्यात आले. जागतिक फिजीओथेरेपी फेडरेशनने 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक फिजीओथेरेपी दिन म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार डॉ. उल्हास पाटील फिजीओथेरेपी महाविद्यालयात जागतिक फिजीओथेरेपी दिनानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वैद्यकीय अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ वर्षा पाटील,श्रीमती गोदावरी पाटील,वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड,आशिष भिरूड, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, डॉ. सचिन चौधरी,डॉ कल्याणी नागुलकर, डॉ नेहा इंगळे-चौधरी, डॉ. मिलींद कहिले,डॉ नेहा देशमुख-कहिले डॉ. प्रिया देशमुख, डॉ. खदीजा ध्रोलीया,डॉ अर्पिता राठोड,राहूल गीरी, गणेश वारके,भारती चौधरी स्टुडंट असो ऑफ फिजीओथेरेपीचे सदस्य व सर्व विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते. फिजीओथेरेपी डे निमीत्त विद्यार्थ्यांनी आर्कर्षक रांगोळी काढली. यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. वर्षा पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात फिजीओथेरेपीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रूग्णांना स्टुडंट असो ऑफ फिजीओथेरेपीचे सर्व विद्यार्थ्यांनी खाउच्या पैश्यातून विकत आणलेले वॉकर,कुबडी, पायाचा पटटा इ साहित्य व फळाहाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टुडंट असो ऑफ फिजीओथेरेपीचे सदस्यांनी परिश्रम घेतले. याचबरोबर डॉ नेहा इंगळे यांनी आकाशवाणी, तसेच डॉ प्रिया देशमुख यांनी एफ एम रेडीओच्या माध्यमातून फिजीओथेरेपी बददल जनजागृती केली.