जळगाव : आज ८ डिसेंबर रोजी इन्स्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड सोशल सर्व्हिसेस जळगांव संचलित उत्कर्ष मतिमंद विद्यालय जळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर विविध बौद्धिक खेळ व क्रीडा यात सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी जळगाव तालुका पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री.सागर शिंपी साहेब,पोलीस उपनिरीक्षक वंदना सोनूने मॅडम आणि इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षा सौ.रिटा भल्ला मॅडम , सौ.स्मिता पाटील सेक्रेटरी इनरव्हील क्लब ऑफ जळगाव इस्ट , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ.तुषार फिरके ,सौ.डॉ.काजल फिरके सदस्य इनरव्हील क्लब ऑफ जळगाव इस्ट तसेच जळगाव तालुका पोलीस हवालदार श्री.अरुण सोनार व पोलीस नाईक श्री.जितेंद्र पाटील व शाळेचे अध्यक्ष श्री.सुरेश शामराव पाटील , उपाध्यक्ष श्री.एम.एन.महाजन साहेब, पी.डब्लू.डी च्या अभियंता सौ.बिऱ्हाडे मॅडम व पालक उपस्थित होते.सुरवातीला सरस्वती पूजन व ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बादलीत बॉल टाकणे, सॅकरेस , तीन पायाची शर्यत , सायकलिंग , रांगोळीत रंग भरणे यासारख्या ११ स्पर्धाचे हिरवा झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली.विद्यार्थ्यांनी सर्व खेळ आनंदाने खेळले विद्यार्थ्यांसोबत मा.सागर शिंपी साहेबानी सुद्धा आनंद लुटला.त्यानंतर झालेल्या स्पर्धेचे बक्षिस वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.बोरसे संजय यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राहुल पाटील यांनी केले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री.अक्षय कुलकर्णी ,अरुण हडपे,सुनील पाटील ,सुनील सोनवणे, सौ.सरोज बडगुजर ,श्रीमती सविता भावसार ,सौ.वैशाली भोळे,मनीषा ठाकरे, कुमारी अश्विनी पवार ,श्री.गोविंद पाटील,श्री.दौलत पवार,रमण नायडू ,रामभाऊ वानखेडे,शांताबाई मानकरी,सुनीता पाटील यांनी परिश्रम घेतले.