जागतिक महिला दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

अमळनेर -दिनांक-१० मार्च२०२०-तालुका विधी सेवा समिती व अमळनेर वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमानेजिजाऊ व्यायामशाळेत जागतिक महिला दिनानिमित्त  कार्यक्रम जिजाऊ व्यायाम शाळेत आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी मा.श्रीमती एस. एस.अग्रवाल सह दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी  प्रथम वर्ग अमळनेर यांनी महिलांच कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण यावर खूपच छान सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं.
एस.एन.डी.टी.महिला महाविद्यालयातील सह प्राध्यापिका श्रीमती डॉ. मंजुषा खरोले यांनी महिला शिक्षण व सबलीकरण याचं महत्त्व पटवून दिलं.तहसील कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती संगीता धोंगडे यांनी महिलांविषयी शासकीय योजनांची माहिती दिली.सूत्र संचालन प्रा. नयना नवसारीकर यांनी केलं.आभार प्रदर्शन ऍड.भारती अग्रवाल यांनी केले.ग्राहक पंचायत च्या अध्यक्ष ऍड भारती अग्रवाल,सचिव सौ.कपिला मुठे,संघटक करुणा सोनार,उपाध्यक्ष सौ.स्मिता चंद्रात्रे, कोषाध्यक्ष सौ.वनश्री अमृतकर ,सदस्य ऍड.उमा अग्रवाल, सौ.गंगा अग्रवाल, श्रीमती विमल मैराळे आदी उपस्थित होत्या.
 
अमळनेर महिला मंचच्या अध्यक्ष श्रीमती अपर्णा मुठे,सौ. कांचन शाह, सौ.सरोजभांडारकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केले.या प्रसंगी महिला मंचच्या सौ.विद्या हजारे, सौ.पदमजा पाटील , सौ.शीला पाटील व मोठया संख्याने महिला वर्ग उपस्थित होता.
सामुहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.