जळगाव । जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांच्या सत्कार करण्यात आला. बुधवार 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कौटुंबिक जबाबदार्या सांभाळून समाजात वावरणार्या गरजूंना आपली मदत व्हावी यासाठी सदैव धडपड करणार्या महिलांना आपल्या कार्यात प्रोत्साहन मिळावे यासाठी या महिलांचा सत्कार करण्यात आला. दैनंदिन जीवनात होत असलेली धडपड विसरून समाजकार्यात स्वतःला झोकून देणार्या महिलांचे कार्य खरोखरच मोलाचे असल्याचे मान्यवरांकडून सुर निघाला.
त्रिमुर्ती शिक्षण संस्थेत कर्मचारी महिलांचा सत्कार
बुधवार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन निमित्ताने त्रिमुर्ती तंत्रशिक्षण आणि औषध निर्माण महाविद्यालय मध्ये महिला कर्मचारी व विद्यार्थीनींचा पेन आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी महिला दिनाचे महत्त्व विषद केले. पाटील यांनी सांगितले की, 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली तसेच 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसर्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ‘जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, पुढे 1975 हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर करून 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा होऊ लागला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. दिनेश पाटील, प्रशांत गायकवाड, प्राचार्य अनुप कुलकर्णी आणि कर्मचारी वर्ग आदींची उपस्थिती होती.
शाहू रुग्णालयात महिला डॉक्टर्स, परिचारिका, आया यांचा सन्मान
जळगाव शहर मनापा पिसिपोएनडीटी सल्लागार समिती कडून छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात सेवाभावी महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी हे होते. यावेळी समितीच्या सदस्य वासंती चौधरी, अॅड. मंजूळा मुंदडा, डॉ. योगेश चौधरी, डॉ.राम रावलानी, डॉ. नीलिमा भारंबे, डॉ. शिरीष ठुसे, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. सोनल कुलकर्णी, डॉ.पल्लवी नारखेडे, सायली पवार, डॉ. विजय घोलप, डॉ. संजय पाटील, सुभाष सनेर आदी उपस्थित होते. डॉ. राधेश्याम चौधरी यांनी महिलांचे महत्व, त्यांच्या त्याग, सेवा, समर्पण या गुणांच्या आधारे विषद केले. जेव्हा जेव्हा महिलांना संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी स्वतःला सरस, सामर्थ्यवान सिद्ध केल्याचा इतिहास सर्वांना माहीतच आहे. इतर कुणाशिवाय जग चालू शकेल, पण महिलांशिवाय जग अस्तित्वातच राहू शकत नाही, असे सांगितले.
दर्जीतर्फे कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव
दर्जी फाऊंडेशनतर्फे जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांच्या सत्कार करण्यात आला. 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कौटुंबिक जबाबदार्या सांभाळून समाजात वावरणार्या गरजूंना आपली मदत व्हावी यासाठी सदैव धडपड करणार्या महिलांना आपल्या कार्यात प्रोत्साहन मिळावे यासाठी या महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्या पल्लवी पाटील, नगरसेविका दिपाली पाटील, श्रीराम उद्योग समूहाचे प्रमुख श्रीराम पाटील, हरित सेनेचे प्रविण पाटील, दर्जी फाऊंडेशनचे संचालक गोपाल दर्जी, ज्योती दर्जी आदी मान्यवर उपस्थित होते. कर्तुत्ववान महिलांमध्ये मंगला मोरे, वैशाली पाटील, पल्लवी जोशी, सिमा भारंबे, सविता बोरसे, सरिता माळी, नथूबाई गवळे या महिलांचा सत्कार केला. जिवनात धडपड विसरून समाजकार्यात झोकून देणार्या महिलांचे कार्य मोलाचे असल्याचे मत पल्लवी पाटील यांनी व्यक्त केले.
शासकीय तांत्रिक विद्यालयात व्याख्यान
शासकिय तांत्रिक विद्यालयात अॅड. ज्योती सुनिल भोळे, जळगाव यांचे “महिलांची सुरक्षितता” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.महिलांमध्ये अनेक चांगले गुण असून त्यांनी त्यांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. यावेळी त्यांनी महिलांना काही टिप्स सुद्धा दिल्या. प्रतिकुल परिस्थितीमध्ये आपली सुटका कशी करुन घेता येईल हे पहावे. त्याच बरोबर तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.ए.महाजन यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना सायबर क्राईम होवू नये म्हणून मार्गदर्शन केले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.बी.वाघमारे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, जळगाव यांनी संविधानातील अधिकारांबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. वरील पाहुण्यांनी शाळेतील शिक्षकिय कर्मचारी व इतर महिला व विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डी.एल.बोंडे यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेतील बी.पी.झोपे, पी.बी.पाटील, श्री.जगताप, श्री. मराठे, देवरे मॅडम, श्री. कडारे, श्री. गवळी, श्री. गोसावी, श्री. आहिर, श्री, चव्हाण, हासे, के. आर. पाटील, जी.पी. ठोबरे, श्री. भालेराव, एस.बी.चौधरी, श्री. विसपुते, कुलकर्णी मॅडम, चौधरी मॅडम, मेहेर मॅडम आदी उपस्थित होते.
मराठी प्रतिष्ठानतर्फे ‘आदर्श कष्टकरी पुरस्कार’
येथील मराठी प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काल शहरामधील 30 महिलांना ‘आदर्श कष्टकरी पुरस्करा’ने सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिती अग्रवाल या होत्या. व्यासपिठावर संंगिता पाटील, सौ.शिसोदीया, सौ.मणीयार, मराठी प्रतिष्ठानच्या संंध्या वाणी, सुरेखाताई बर्हाटे, निलोफर देशपांडे, अनुराधा रावेरकर, हर्षाली चौधरी, शहनाज देशपांडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्फुर्ती महिला मंडळाच्या सौ.राजहंस, सौ.चावरे, सौ.शिंदे, सौ.रावेरकर, सौ.कुलकर्णी यांनी महिला जीवनाबद्दल भारूड सादर केले. महिलांना साडी, चोळी, गृहोपयोगी वस्तु देवून सन्मानित करण्यात आले. सुत्रसंचालन सुवर्णा वाणी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मराठी प्रतिष्ठानची संचालिका संजीवनी तायडे, माधवी मुळे, जयश्री मालपुरे यांनी परीश्रम घेतले.
ममुराबाद फार्मसी महाविद्यालयात ‘जग व महिला’ वर चर्चा
शेलीनो एजुकेशन सो.चे नानासाहेब आर.जी.पाटील इंस्टीटयूट ऑफ फार्मसी ममुराबाद येथे जागतिक महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन प्राचार्य. डॉ.तुषार देशमुख व प्रा.वाय.आर. जोशी यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर महिलादिना निमित्त सर्व प्रध्यापिका व विद्यार्थिनीनी मिळून केक कापला तसेच या वेळी काही प्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच विद्यार्थिनीन साठी विविध खेळांचे आयोजन या वेळी करण्यात आले होते. तसेच आजचे जग व महिला या विषयावर खुली चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारीवर्ग कार्यक्रमास उपस्थित होते.
वार्ड क्र. 6 मध्ये ‘कॉक्रीटीकरणा’चा शुभारंभ
8 मार्च रोजी जागतीक महिला दिना निमित्त शहरातील वार्ड क्रमांक 6 मधील नगरसेविका पद्माबाई भागवत सोनवणे यांच्याहस्ते रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी परीसरातील नागरीकांना महिला दिनाचे महत्व सांगितले. त्याचप्रमाणे महिलांना सन्मान द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी रस्त्यासोबत नागरी सुविधांसाठी गटारीच्या कामांचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी रविंद्र जाधव, मुकुंद सोनवणे, इंजि.शकिल शेख, युवराज सोनवणे, आकाश सोनवणे, जितेंद्र बोदडे यांच्यासह वार्डातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे कार्यक्रम
बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेने जागतिक दिनानिमित्त महिलांसाठी स्नेह मिलानांचा कार्यक्रम अणुव्रत भवन, प्रताप नगर, जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. डिंपल पिपरिया (एम.डी) प्रमुख पाहुणे म्हणून शारदाश्रम या शाळेच्या संचालिका चेतना नन्नवरे तसेच व्याख्याते म्हणून जळगाव जनता इन्फोटेक प्रा.लि.चे सर व्यवस्थापक संजय कुळकर्णी उपस्थित होते. संजय कुळकर्णी यांनी ऑनलाईन तसेच कॅशलेस व्यवहार यावर पावर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. चेतना नन्नवरे यांनी महिलांच्या दैनंदिन जीवनातील तणावाचे व्यवस्थापन कसे करावे व सोबत व्यायामाचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डिंपल पिपरिया यसांनी महिलांच्या आरोग्याविषयी घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई पाटील या सरकारी दवाखान्याच्या आवारातील सेवालयाच्या स्थापनेपासून अन्नपूर्णा योजनेत भोजन वाटपाचे कार्य करीत असून महिलांच्या प्रसुती कक्षातील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका सविता नाईक, सुत्रसंचालन कल्पना वाणी, आभार प्रदर्शन संस्थेच्या संचालिका कुमुदिनी नारखेडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता मंजुषा कुळकर्णी व स्मिता दप्तरी यांच्या पसादानाने झाली. कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाटील, उपाध्यक्ष राधेश्याम बजाज व समस्त संचालक मंडळ, व्यवस्थापन व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
परिमंडळ महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचा गौरवदिन महावितरणच्या जळगांव परिमंडळ कार्यालयात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्याने महावितरणच्या प्रशासनात कार्यरत अधिकारी-कर्मचारी महिलांचा प्रातिनिधीक सन्मान मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्याहस्ते पुष्प देऊन करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर म्हणाले की, मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. महिलांची सामाजिक भागीदारी दिवसेंदिवस वाढत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. महावितरण प्रशासनातही सर्व पातळीवर कार्यरत महिलांचे योगदान मोलाचे आहे. यापुढेही त्यात सातत्य राहील याची खात्री आहे. सर्व तांत्रिक व अतांत्रिक कामे, प्रामुख्याने वीज चोरी, थकबाकी वसुली मोहिमात महिला अधिक कार्यक्षमतेने आपली जबाबदारी भुषवित आहेत. याचा प्रशासनाला अभिमान आहे. महिला अधिकारी- कर्मचार्यांचे पाठीशी प्रशासन खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही श्री.जनवीर यांनी दिला. याप्रसंगी जळगांव मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय आकोडे, सहाय्यक महाव्यवस्थापक राजेंद्र म्हंकाळे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रदीप पवार, कार्यकारी अभियंता (ग्राहक गार्हाणे मंच) धनंजय मोहोड यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी संध्या तायडे, दिपाली सोनार, छाया पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर तर संचालन जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी केले.
जयकिसनवाडी महिला मंडळातर्फे पॅनकार्ड शिबीर
जयकिसनवाडी महिला मंडळातर्फे आयोजित व बांधकाम क्षेत्रातील सुप्रसिध्द संस्था पीपीआरएल प्रायोजित पॅनकार्ड शिबिरास नागरिकांचा उत्साहात प्रतिसाद मिळाला. दिवसभरात 200 वर नागरिकांनी पॅनकार्डसाठी ऑनलाईन नोंदणी झाली. जागतिक महिला दिनानिमित्त हे शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन जी. एच. रायसोनी मॅनेजमेंट इन्स्टिट्युटच्या संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांच्याहस्ते झाले. प्रमुख पाहुणे पीपीआरएलचे विनयभाई पारख व एकता रिटेल किराणा पतसंस्थेचे अध्यक्ष ललितभाई बरडिया, ऑनलाईन नोंदणी करणारे एनएसडीएलचे प्रतिनिधी रितेश छोरिया होते. यावेळी मंडळाच्या अध्यक्ष सुनिता वर्मा, सचिव प्रिया इच्छापूरकर व कोषाध्यक्ष अनिता सोनवणे यांनी स्वागत केले. हे शिबिर जयकिसनवाडीत पीपीआरएलच्या ऑफीसजवळ झाले. उद्घाटनाच्यावेळी प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या की, जागतिक महिला दिनाच्या दिवशी जयकिसनवाडी महिला मंडळाने घेतलेला पॅनकार्ड नोंदणी उपक्रम चांगला आहे. महिलांच्या संघटन शक्तीतून अनेक चांगल्या कार्यक्रमांचे आयोजन करता येते. सूत्रसंचालन मिनल सोनी व निता व्यास यांनी केले. ऑनलाईन नोंदणीसाठी माधुरी शिरुडे, प्रतिक देवरे, प्रशांत पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी मंडळाच्या सदस्या हंसा कालाणी, प्रेमा वर्मा, माधुरी येवले, पूनम गजरे, भारती जाधव, संध्या पाटील, भावना जाधव, सुरेखा बोरसे, सरीता वर्मा, किरण जाधव, शोभा वाणी, सरोज परदेशी, जयश्री व्यास, पुष्पा व्यास, मंजू वाणी व सीमा रॉय आदी उपस्थित होते. नोंदणीसाठी युवतींचा प्रतिसाद मिळाला.