जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन

0

जळगाव- आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मू. जे. महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागच्यावतीने जनजागृतीसाठी रॅली व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. पथनाट्य सादरीकरणात मानसिक आरोग्य या विषयावर मानसिक विकृतीची कारणे, लक्षणे व उपचार मार्गदर्शन करण्यात आले. तसेच समस्याग्रस्त व्यक्तीला आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनी, मित्रांनी, शिक्षकांनी व कुटुंबातील सदस्यांनी समजून घेवुन त्यांच्यासोबत संवाद साधण्यासोबत मानसोपचाराची सुद्धा गरज असते. जसे आपण शारीरिक आरोग्याची काळजी घेतो तशीच काळजी मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी घेणे आवश्यक आहे. आज जगात मानसिक विकृतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. याची दखल आता घेतली नाही तर भविष्यात मानसिक विकृतीची सर्वात मोठी समस्या निर्माण होईल म्हणून आज सुद्रुड मानसिक आरोग्य राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे.

यासाठी मू.जे.महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्यावतीने सकाळी ९.०० वाजता पथनाट्य आणि रॅलीचे आयोजन केले. सदर रॅली मू. जे. महाविद्यालय, प्रभात चौक, स्वतंत्र चौक, नवीन बस स्थानक, शिवाजी चौक, नूतन मराठा महाविद्यालय, ख्खाजामिया चौक, रिंग रोड मार्गे मू. जे. महाविद्यालय पर्यंत नियोजित करण्यात आली. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी. पी. लभाणे, डॉ. स. ना. भारंबे, प्रा. अशोक पाटील, डॉ. बालाजी राउत, डॉ. राणी त्रिपाठी व प्रा. निलिमा मेंडकी व राहुल पाटील इ. उपस्थित होते. पथनाट्य सादरीकरणात मानसिक आरोग्य या विषयावर स्वराज्य सामाजिक व सांस्कृतीक चळवळ गृप व मानसशास्त्र विभागातील विनोद पाटील , विकास वाघ , चंद्रकांत इगळे, वर्षा उपाध्ये , नेहा पवार, अमोल सोनवणे, विशाल बोदडे, बुद्धभूषण मोरे, राहुल वाघ व प्रफुल्ल रायसिंग या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले तसेच रॅलीत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.