हडपसर : जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त (दि.9) रोजी डॉ.अभय सदरे यांच्या वतीने आरोग्य विषयक व्याख्यान व हिंदी संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बी.जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले आणि प्रमुख पाहुणे म्हणुन पराग करंदीकर हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन गॅलक्सि डायलिसिस सेंटर ,कोथरूड डायलासीस सेंटर,अलायंस डायलासीस सेंटर,किडनी केअर क्लिनिक यांनी केले असून कन्नडा संघ ( कलमाडी ऑडिटोरियम) एरंडवना येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी दैनंदिन जीवनात मूत्रपिंडाची निगा कशी राखावी,याची माहिती किडणी विकार तज्ज्ञ डॉ.गणेश म्हेत्रस, तर डायलासीस ची गुणवत्ता व त्याचे महत्त्व, याची माहिती डॉ.अभय सदरे व डायलासीस पेशंटना पोषक आहार याची माहिती डॉ. अर्चना राय देणार आहेत. तसेच हिंन्दी संगीत रजनी कार्यक्रम सायं 6 ते 8 वाजता होणार आहे.