जळगाव । अयोध्यानगर परिसरात व मेहरूण येथे भारत सरकार खेल व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र व तुळजाई संस्थेतर्फे नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समनव्यक अतुल निकम साहेब व सुनील पंजे यांच्या मार्गदर्शनाखली जागतिक योग दिन पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे स्वामी विवेकानंदचे अध्यक्ष पितांबर भावसार, लोकसंवाद संस्थे चे अध्यक्ष शिरिष तायडे, लक्ष्य फाऊंडेशनचे रोशन मराठे, जितेंद्र सोनवणे, संध्याप्रकाश फाऊंडेशनचे सचिव राजेंद्र वंजारी, जिल्हा परिषद चे किरण लाडवंजारी,मनीष चव्हाण आदींची उपस्थिती होती.
शिबीरात यांनी केले मार्गदर्शन
शिबिरास योगा विषयी जितेंद्र सोनवणे यांनी मार्गदर्शन केल्यानंतर राजेंद्र वंजारी यांनी केले योगाचे प्रकार सांगितले तर लोकसंवाद संस्थे चे अध्यक्ष शिरिष तायडे यांनी दैनंदिनी योगा करा आणि उत्तम आरोग्य ठेवा याविषयी मार्गदर्शन केले, तुळजाई संस्थेचे अध्यक्ष-भूषण लाडवंजारी यांनी योगासन जीवनात खूप गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. समारोप प्रसंगी स्वामी विवेकानंदचे अध्यक्ष पितांबर भावसार यांनी योगाचे प्रकार करून दाखवले. शिबिरचे सूत्रसंचलन तुळजाई संस्थेचे सहसचिव माचिंद्र सोनवणे यांनी केले तर आभार नरेंद्र पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी तुळजाई संस्थांचे पदाधिकारी नितीन पाटील मनोज वंजारी, तसेच नेहरू युवा केंद्र चे स्वयमसेवक परिश्रम घेतले.