रावेर । जागतिक वन दिनानिमित्त वनविभाग आणि आदित्य इंग्लिश स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षपूजन कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पद्माकर महाजन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे, वासू नरवाडे, संदीप सावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
सुत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले. प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी मांडले. आभार सलगर यांनी मानले. यावेळी प्राचार्य संजय पाटील, ईश्वर पाटील, भागवत तायडे, गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.