जागतिक सर्व्हेक्षणाचे निष्कर्ष; चीनच बाजीगर!

0

न्यूयॉर्क – जगातील ३८ देशांमध्ये केलेल्या सर्व्हेक्षणात चीन ही आर्थिक महासत्ता असल्याचे मत बहुसंख्येने नोंदविण्यात आले आहे. युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या १० पैकी ७ देशांनी चीनच आर्थिक महासत्ता असल्याचा निर्वाळा दिला आहे.

भारतात चीनला आर्थिक सत्ता मानणारे केवळ २६ टक्केच आहेत. जपान, आशियातील काही देश आणि लॅटिन अमेरिकेत चीनबाबत फारसा चांगला दृष्टीकोन नाही. भारताचा मित्र असलेला रशिया मात्र चीनला आर्थिक महासत्तेचा दर्जा मुळीच मागे हटलेला नाही. ऑस्ट्रेलिया खरं तर अमेरिकेचा दीर्घकाल साथीदार. मात्र या देशात चीनला अमेरिकेच्या दुप्पट समर्थन आहे. अमेरिकेत ५१ टक्के लोक अमेरिकेलाच आर्थिक महासत्ता मानतात.

सर्व्हेचे संचालक प्यु यांनी माहिती दिली की अमेरिकेसोबत व्यापार संबंध असलेल्यांना अमेरिका चीन एवढी बल्याढ वाटत नाही. शिवाय भारतासह आशियायी देशांनी अमेरिकेला उचलून धरले आहे. दशकभरापूर्वी ओढावलेल्या आर्थिक पडझडीमुळे यरोपियन राष्ट्रे अमेरिकेला मुळीच वरचा क्रमांक देत नाहीत. आता जर्मनी, ब्रिटन, स्पेन आणि चीन अर्थविश्वात आपले स्थान बनवू पहात आहेत. कॅनडा, ब्राझील, मेक्सिको, फिलीपाईन्स चीनच्या बाजूने आहेत.

अमेरिका किंवा चीन कुणीही महासत्ता असेल पण जगात दोन्ही देशांच्या नेत्यांबद्ल झी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल नकारात्मक मते आहेत.