जागर प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी वर्धापन दिनानिमित्त जागर गौरव व ग्रंथ पूजन सोहळा

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे, साहित्यिक व अधिकारी साधणार भुसावळकरांशी संवाद

भुसावळ- जागर प्रतिष्ठानतर्फे गुरुवार, 20 सप्टेंबर 2018 रोजी वर्धापनदिनानिमित्ताने जागर गौरव सोहळा व मराठी पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन ब्राह्मण संघात सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भुसावळातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, गझलकार रमेश सरकटे आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या आय.एम.ए.वुमेन्स विंग अध्यक्षा डॉ.नीलिमा नेहते यांना मानाचा जागर गौरव पुरस्कार 2018 देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य पुस्तक प्रदर्शनी भरवण्यात येणार आहे.

यांची राहणार प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे असतील. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ.किसन पाटील असतील. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे महेश फालक, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, भुसावळ मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील, जिल्हा परीषद सदस्य प्रभाकर सोनवणे, काँग्रेस शिक्षक जिल्हाध्यक्ष शैलेश राणे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, नगरसेवक रमेश नागराणी, प्रमोद नेमाडे, अ‍ॅड.तुषार पाटील उपस्थित राहणार आहे.कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, कोषाध्यक्ष हृषीकेश पवार, सचिव प्रा.निलेश गुरुचल, कायदे सल्लगर अड. हरेशकुमार पाटील, जागर मित्र पवन पाटील, गोकुळ सोनवणे यांनी केले आहे.