दोन मजुरांचा संसाराची झाली राख-रांगोळी उघड्यावर
90 हजार लाख रूपये रोख रक्कम खाक
जळगाव । डी मार्ट जवळील मोहाडी रस्त्यावर रस्त्याच्या कडेलाझोपट्या टाकून राहत असलेल्या मजुरांच्या झोपड्यांना जागा मालकाने आग लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली असून मजुरांचा संसार आत उघड्यावर पडला आहे. अग्नीशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली. या आगीच्या घटनेमुळे लहान मुले, वृध्द महिला व 10 दिवसाच्या बाळाला घेऊन त्याची आई धावतच सुटले व त्यांनी स्वत:चा जीव वाचविला. जागा मालक दिनेश गुजराथी याची झोपड्डी लायटरच्या सहाय्याने पेटविली. काही वेळातच झोपडीने पेट घेतल्याने सर्वत्र पळापळ झाली. दिनेश याचा झोपडीतील लहान मुले, महिलांनी अक्षरश जीव मुठीत घेवून पळ काढला. काही वेळातच झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली. झोपडीतील सर्व संसारपयोगी साहित्याची राख-रांगोळी झाली. 7-8 कोंबड्या तसेच घरातील डब्यात सुमारे 90 हजार लाख रूपये रोख असून ते देखील जळुन खाक झाल्याचे गुजराती यांनी सांगीतले.
दरम्यान, या प्रकारानंतर गुजराती हे कुटुंबियांसह एमआयडीसी स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले होते. या घटनेनंतर गुजराती कुटुंबियांसह सर्व झोपड्यांमधील नागरीक प्रचंड भीतीत होते. लहान मुले अक्षरश: झाडाखाली रडत बसलेली होती. तर आगीत संसाराची राख-रांगोळी झाल्यामळे गुजराती कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून शहरात मोलमजूरी करणारे काही मजूरांनी राहण्यासाठी लांडोरखोरीजवळ असलेल्या मोहाडी रोड रस्त्यावर मजूर झोपडी टाकून राहतात. ज्या ठिकाणी मजूरांनी झोपडी टाकली होती. गेल्या 20 ते 22 वर्षांपासून मोहाडी रस्त्यावर दौलत नगरच्या समोरील मोकळ्या जागेत परराज्यातून आलेले कुटुंब वास्तव्य करीत आहेत. या ठिकाणी आता मोठमोठे बंगले व अपार्टमेंटसचे बांधकाम सुरु आहेत. त्यामुळे तेथे झोपड्यांमध्ये राहणार्या कुटुंबांना जागा मालकाने जागा रिकामी करण्याचे सांगितले होते. रविवारी विजय व पिंटू नावाचे दोन तरुण आले. काहीही एक कारण न सांगता त्यांनी दिनेश कन्नू गुजराथी व अंकुश रमेश हातडिया या दोघांच्या कुटुंबाशी धक्काबुक्की व महिलांना मारहाण करुन झोपड्या तोडायला सुरुवात केली.
महिलांना केली धक्काबुक्की
महिला धक्काबुक्की करीत असताना विजय याने सिगारेट पेटविण्याच्या लायटरने झोपड्यांना आग लागली. रणरणत्या उन्हात अचानक आगीचे लोळ उठल्याने झोपड्यामध्ये बसलेली दिनेशची पत्नी पूनम, तिचा दहा दिवसाचा मुलगा व सिमा (वय 3), विशाल (वय 6) खुशी (वय 8) यांना कवेत घेऊन घराबाहेर धावतच सुटली. अंकुश याच्या घरातही त्याची पत्नी पूनम व पक्षघाताचा आजार झालेले नातेवाईक हिरा राजू गावडिया हे देखील बाहेर धावतच आले. सर्वांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते.