भडगाव (प्रतिनिधी ) : – येथील सामाजिक कार्यात अग्रेसर अश्या जागृती मित्र मंडळाने केळीच्या कमळापासून दहा फूटी गणेश मूर्ती बनवली असून भडगाव शहरांत प्रथमच अशी मूर्ती बनवली असल्यामुळे गणेश भक्त मूर्ती पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. जागृती मंडळाचे अध्यक्ष अतुलसिंग परदेशी यांच्या संकल्पनेतून सदर मूर्ती साकारण्यात आली आहे. सदर मूर्ती बनवण्यासाठी 500 केळीचे कमाळाचे फुल लागले असून, कानांसाठी केळीचे पान, सुळ्यांसाठी मुळे, इतर अवयव या साठी कोबी, फुल, मोसंबी, फुल यांचा कल्पकतेने उपयोग केला आहे. सदर मूर्ती सकरण्यासाठी सिद्धू भांडारकर, मंदार कासार, प्रदीप मासारे, स्वराज देसले , प्रवीण बंगाले , मनोज वाणी कार्यकर्त्यानी विशेष परिश्रम घेतले. मंडळाने या वर्षी सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, सौर ऊर्जा, आधुनिक शेती, डिजिटलयाझेशन, मतदार जागृती. पर्यावरण संवर्धन, जल साक्षरता इत्यादी विषयावर सजीव आरास केली आहे. गणेश दर्शन व सजावट पाहण्यासाठी कालपासून नागरिक गर्दी करीत आहेत.