जागृत मारुती शिरसाळा देवस्थानास ब वर्ग  तीर्थस्थळाचा दर्जा 

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश  

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर  विधानसभा क्षेत्रात मोडणाऱ्या बोदवड तालुक्यात असलेले धार्मिक देवस्थान व तीर्थस्थळ (पर्यटनस्थळ) जागृत मारुती शिरसाळा  हे देवस्थान राज्यभरात प्रसिद्ध आहे. हे स्थळ  सर्व जाती, धर्म व समाजातील लोकांकरिता श्रद्धा व आस्थेचे केंद्र आहे. या ठिकाणी दर शनिवारी  लाखोच्या संख्येने भाविकांचे आगमन होत असते. या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक भाविकांची ग़ैरसोय होत असते. तरी या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्दाला धरून तसेच येथे ब वर्ग दर्जा प्राप्त व्हावा अशी मागणी जय श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, शिरसाळे ता. बोदवड जि. जळगांव या ट्रस्ट चे अध्यक्ष , उपाध्यक्ष तसेच विश्वस्त व गावकऱ्यांनी केल्याने यासाठी  या क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या देवस्थान व तीर्थस्थळाचे दर्जा वाढ करून “ब”वर्गाचे देवस्थान व पर्यटन स्थळ बनविण्याकरिता पुढाकार घेवून भागीरत प्रयत्न सुरु केलेले आहे याच प्रयत्नांना प्रचंड यश आलेले असून त्यांनी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून मागणी लावून धरली होती. या मागणीला यश आलेले असून त्यानुसार, जय श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, शिरसाळे ता. बोदवड जि. जळगांव या तीर्थक्षेत्रांस  “ब” वर्ग दर्जा प्रदान करण्यात आला असून यासंदर्भात महाराष्ट्र शासन,ग्राम विकास विभाग, शासन निर्णय २३ मार्च, २०२३. अन्वये परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे.

“आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नामुळे आता शिरसाळा मारुती येथील देवस्थान व तीर्थस्थळाच्या पर्यटन दर्जेत वाढ करुण “ब” वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने तसेच सोबतच या तीर्थस्थळाचा सर्वांगीण विकास होणार असल्याने या बाबत सर्व जनतेने तसेच मारुती भक्तांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहे.”