पिंपरी : जागेच्या वादातून किराणा दुकानाची टपरी पेटवून दिली. यामध्ये दुकानातील साहित्यासह दुकानात बांधलेल्या दोन शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळ घडली. रफीक चांदसाहेब शेख (वय 27, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार जावेद मुसा कुरेशी (वय 36, रा.पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रफीक यांचे खुशबू किराणा स्टोअर नावाची किराणा मालाची टपरी आहे. आरोपी जावेद याने त्या जागेवर हक्क सांगून दुकान तेथून हटवण्यास सांगितले होते. मात्र रफीक यांनी दुकान हटवले नाही. याचा राग मनात धरून जावेद याने टपरी पेटवून दिली. दुकानात रफिक यांनी एक शेळी आणि एक बोकड बांधले होते. दुकानाला लागलेल्या दोन शेळ्यांच्या होरपळून मृत्यू झाला. तसेच दुकानातील फ्रीज आणि किराणा माल असे एकूण 54 हजारांचे साहित्य जळून खाक झाले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.