…जाग आली नाही तर भाजपा नसबंदी करेल

0

अहमदनगर । भाजपा सरकारने 8 नोव्हेबर रोजी नोटाबंदी केली, त्याचवेळी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे बहुसंख्य नगरपालिका भाजप जिकल्या.त्यावेळेस भाजपा नेते म्हणाले की,नोटाबंदी की, तो भी जनता हमारे साथ है.आता जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आहे.आता जर जनता सावध झाली नाही तर नसबंदी निश्‍चित आहे. असा घणाघात राष्ट्रवादीचे आमदार व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अहमदनगरमध्ये केला आहे.

फडणवीस सरकारच्या 11 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मासबंदीच्या निर्णयाचा फायदा निवडणुकीत झाला.त्याचबरोबर नोटाबंदीच्या निर्णयाने नगरपालिका जिकल्या.जर आताही तुम्ही सावध झाले नाही तर आता नसबंदी करतील, असा इशारा मुंडे यांनी सभेत बोलतांना दिला. मोदीच्या सभेचा परिणाम अजूनही माझ्यावरून जात नाही आहे. भारतीय जनतेला ‘अच्छे दिन’ चे अमीष दाखवले.मात्र तीन वर्षात ‘अच्छे दिन’ ची चेष्टा झाल्याचे ते म्हणाले,मोदीजी फकीर असल्याचे सांगतात,मात्र आम्ही संसारी आहे अमाची वाट लावणार का ? असा प्रश्‍न ही मुडेंनी केला.भ्रष्टाचाराचा आरोप करुन सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारच्या 11 मंत्र्यांनी तीन हजार 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला. शिक्षण, आरोग्य, आदिवासी, महिला आणि बाल कल्याण खात्यात भ्रष्टाचार झाला, मात्र मुख्यमंत्री क्लीन चिट देत आहेत, असाही आरोप धनंजय मुंडेंनी केला.भ्रष्टाचाराचे पुरावे खोटे असल्यास फाशी द्या, पुरावे खरे असल्यास एक दिवसही खुर्चीवर बसू नका, असं आव्हानही त्यांनी दिलं.