जळगाव : दुसर्यांदा मुलगा झाला नाही म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केला. सासरच्या मंडळींकडून वारंवार होणार्या त्रासाला कंटाळून 23 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात पती, सासु-सासरे व दिरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सोनगीरपाडा येथील माहेर असलेली व जळगावातील खोटेनगर परिसरातील विठ्ठलवाडी येथील सासर असलेल्या बबिता क्रांतीलाल पवार वय 23 या विवाहितेला दुसर्यांदा मुलगी झाल्याने तिचा सासरच्यांनी वारंवार छळ केला. या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती क्रांतीलाल एकनाथ पवार, सासरे एकनाथ पवार, सासु विमलाबाई पवार, दिर शांतीलाल पवार या चौघांविरुध्द भादवी कलम 306, 498 प्रमाणे गुन्हा दाखल झाला.