जाच असह्य झालेल्या वरणगावच्या विवाहितेने पेटवून घेतले

0
चारीत्र्याच्या संशयावरून केला छळ ; पतीविरुद्ध गुन्हा 
भुसावळ- तालुक्यातील वरणगाव येथील रामपेठ भागातील विवाहितेचा चारीत्र्याच्या संशयावरून छळ केल्याने जाचास कंटाळून विवाहितेने पेटवून घेतल्याने तिचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भारती नीलेश भोई (22) मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ छोटू खेमचंद भोई (32, फैजपूर) यांनी पती नीलेश सुखलाल भोईविरुद्ध तक्रार दिल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला दारूचे व्यसन असलयाने त्यांनी विवाहितेच्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेतला तसेच आपला मुलगा नसल्याचे सांगत विवाहितेला मारहाण करीत गांजपाठ केल्याने जाच असह्य झाल्याने विवाहितेने पेटवून घेतल्याने तिचा मृत्यू झाला. तपास उपनिरीक्षक नीलेश वाघ करीत आहेत.