वरणगाव- येथून जवळच असलेल्या जाडगाव येथील जयराम बळीराम जोरावर (30) या युवकाचा इलेक्ट्रीक शॉकने मृत्यू झाला. 24 रोजी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली. घराच्या पत्र्यावरील टॉवेल काढण्यास हा युवक गेल्यानंतर पत्र्यात इलेक्ट्रीक करंट उतरल्याने शॉक लागून या युवकाचा मृत्यू झाला. चरणदास बळीराम जोरावर या या प्रकरणी वरणगाव पोलिसात खबर दिली. दरम्यान, शॉक लागल्यानंतर ग्रामस्थ व नातेवाईकांनी वरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले तर 25 रोजी सकाळी डॉ.क्षितीजा यांनी शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत युवकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.