भुसावळ- तालुक्यातील जाडगाव शिवारातील अप रेल्वे लाईनवर खांबा क्रमांक 452/21 ते खांबा 452/23 दरम्यान 45 ते 50 वर्षीय अनोळखीचा मृतदेह आढळला. मयत ईसम परप्रांतीय असल्याचा संशय असून कुठल्यातरी धावत्या रेल्वेतून त्याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मयताच्या खिशात आसनसोल ते सीएसटी दरम्यानचे 21 ऑगस्ट रोजीचे रेल्वे तिकीट मिळाले आहे. मयताच्या अंगात निळ्या-गुलाबी-पांढर्या रंगाचा शर्ट, पांढर्या रंगाची हाफ बाह्यांचा बनियन, कमरेला करदोडा, राखाडी रंगाची पँट तर उंची 5 फूट 4 इंच आहे. याबाबत वरणगाव रेल्वे उपस्टेशन प्रबंधक सतीश कुमार यांनी वरणगाव पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीलेश वाघ करीत आहेत.