जाडगाव शिवारात अनोळखीचा मृत्यू

0

भुसावळ- तालुक्यातील वरणगावजवळील जाडगाव शिवारात 35 ते 40 वर्षीय अनोळखीचा अज्ञात कारणाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या पूर्वी उघडकीस आली. या प्रकरणी संतोष भागवत वाघोदे (44, जाडगाव, ता.भुसावळ) यांनी वरणगाव पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जाडगाव शिवारात वैशाली राजू बोरोले यांचे शेत असून सोमवारी सकाळी तेथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. अनोळखीच्या अंगात निळ्या रंगाची जीन्स, पायात काळ्या रंगाचा धागा, उंची 170 सेंटीमीटर, डाव्या बाजूस अस्पष्ट गोंदलेले असे वर्णन आहे. अनोळखी इसमाची ओळख पटत असल्यास वरणगाव पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक निलेश वाघ यांनी केले आहे.