जाणता राजा कोणीही होऊ शकत नाही; उदयनराजे भोसलेंची शरद पवार, शिवसेनेवर टीका

0

पुणे : दिल्लीतील भाजप पदाधिकाऱ्याने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे लिखाण करून त्याचे प्रकाशन भाजपच्या कार्यालयात केले. यावरून देशभरात भाजपवर टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणे भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. दरम्यान यावरून भाजप नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोधकांना लक्ष केले आहे. विरोधकांकडून याचे राजकारण सुरु असल्याचे आरोप उदयनराजे भोसले यांनी केले आहे. पत्रकार परिषद घेऊन उदयनराजे भोसले यांनी शिवसेना आणि शरद पवारांवर आरोप केले. आज अनेकांना जाणता राजाची उपमा दिली जाते. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. अशी उपमा कोणालाही दिली जाते त्याचा मी निषेध करतो, जानता राजा उपमा देताना विचार करावा, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली. शिवसेना कार्यालयावर शिवाजी महाराजांची प्रतिमा बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच्या खाली लावण्यात आले आहे यावरून उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेचे नाव बदलून ‘ठाकरे सेना’ करा अशी मागणी करत उदयनराजे भोसले यांनी सेनेला टोला लगावला.