तळेगाव दाभाडे : श्री शिवशंभू स्मारक संस्था आणि लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 10 ते 15 नोव्हेंबर 2018 या दरम्यान होणार्या ‘जाणता राजा’ या महानाट्याची जोरदार पूर्वतयारी सुरू झाली आहे. या संदर्भातील नियोजनाच्या बैठकीस श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे, अध्यक्ष संतोष भेगडे पाटील, रविंद्रनाथ दाभाडे, सुनील शेळके, रविंद्र भेगडे, अॅड.श्रीराम कुबेर, अमोल शेटे, शोभा भेगडे, शुभांगी शिरसाट, युवराज काकडे, संजय बावीसकर, प्रा.दीपक बीचे, डॉ.प्रमोद बोराडे, राजेश सरोदे व लक्ष्मण माने यांच्यासह सुमारे 125 प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. चिराग खांडगे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष संतोष भेगडे पाटील यांनी जाणता राजा या महानाट्याच्या कार्याचा आढावा घेतला. नियोजनाची रूपरेषा सांगितली. युवराज काकडे यांनी विविध समितीचे कार्य व नियुक्त सदस्यांची जबाबदारी यासंबंधी माहिती दिली. संजय बावीसकर यांनी आगामी चाळीस दिवसातील कार्यक्रमाचा व नियोजनाचा तपशील दिला. मैदान व रंगमंचाचे पुजन व शोभायात्रेचे आयोजन करून महानाट्याचा उद्देश व शिवरायांचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा संस्थेचा या माध्यमातून प्रयत्न राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. सुत्रसंचालन सुरेश दाभाडे यांनी केले. प्रा.दीपक बीचे यांनी आभार मानले.