जाणून घ्या ‘ई-पीजी पाठशाळे’विषयी

0

आज शिक्षणक्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर आणि गरज हि वाढू लागली आहे. देशांतर्गत उच्च शिक्षणाचा दर्जा सुधरविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झाले आहे आणि यामुळेच भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने राष्ट्रीय शिक्षा मिशन आयसीटी (NME-ICT, MHRD) च्या सहाय्याने या उपक्रमाची सुरुवात केली असून याचेच फलस्वरूप म्हणून ई-पीजी पाठशाळा ची निर्मिती करण्यात आली आहे. यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगावर जवाबदारी सोपविण्यात आली असून युजीसी आणि इनफलीबनेट, सेंटर (Information and Library Network Center, Gandhinagar) च्या मदतीने हा उपक्रम यशस्वी पणे चालविण्यात येत आहे.

ई-पीजी पाठशालातील घटकांची वैशिष्टे

उच्च दर्जाचे अभ्यासक्रमावर आधारित, अनेक विषयांचे ई कंटेंट मॉड्युल, परस्परवादी संवाद सुविधा तसेच देशातील नामवंत शैक्षणिक संस्थेतील विविध तज्ञाव्दारे तयार करण्यात आलेले जवळपास ७० विषयांचे अभ्यास साहीत्य येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. यांत कला आणि मानव्यविद्या, भाषाशास्त्र, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, जीवन विज्ञान, वैद्यकीय आणि आरोग्य विज्ञान, भौतिक आणि मुलभूत विज्ञान तसेच सामाजिक शास्त्र इत्यादींचा समावेश आहे. या संसाधनांचा उपयोग करण्यासाठी https://epgp.inflibnet.ac.in/Home या संकेत स्थळाचा वापर करावा

संकलन
प्रा.हितेश ब्रिजवासी
ग्रंथपाल
विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत
के.ए.के.पी संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगाव