जात,पात,धर्म बाजूला सारून मानवाने अधिकारासाठी झटावे

0

नवापूर । मानवाला त्यांचा अधिकाराप्रती जागृत करणे हे मानव अधिकार संघटनेचे कार्य असून जात पात धर्म बाजूला सारून मानवाला त्याचे अधिकार मिळवून देण्यासाठी झटावे असे प्रतिपादन मूबंई येथील आंतर राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सनी शाह यांनी नवापूर येथील मेळाव्या प्रसंगी केले. गुजरात व महाराष्ट्र येथील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी वाचनालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

कायद्याचे अज्ञान घातक
याबाबत माहिती देताना डॉ.शाह यांनी सांगितले की मानवाचा जन्मा पासून त्याचे अधिकार सूरू होतात परंतु कायद्याचे अज्ञान असल्याने त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव होत नाही. यासाठी जनजागृती करण्यात यावी कूठलेही कायदे मानव अधिकार डोळ्या समोर ठेवूनच केले जातात.संयुक्त राष्ट्र संघात देखील आंतर राष्ट्रीय मानव अधिकार काउन्सीला विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहीती यावेळी त्यांनी दिली.

नियुक्ती प्रमाण पत्र बहाल
या प्रसंगी महाराष्ट्र काउन्सील सदस्य नोंदणी करण्यात येऊन पदाधिकारी यांना डॉ शाह यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाण पत्र बहाल करण्यात आले. यावेळी काउन्सीलचे व्हा चेअरमन डॉ. बिशप ओमकार प्रदेशाध्यक्ष,गोविंद बिशेन गूजरात,सूनिल गामीत यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमेश वळवी यांनी तर उपस्थितीतांचे आभार प्रदेश सचिव रमेश गावीत यांनी मानले.कार्यक्रमास गुजरात राज्यातील तापी जिल्हा व महाराष्टातील नंदूरबार जिल्हयातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

हे मान्यवर होते उपस्थित
मानव जागृती कार्यक्रम आंतर राष्ट्रीय मानव अधिकार काउन्सीलचे संस्थापक डॉ. सनी शाह यांच्या अध्यक्ष स्थानी मेळावा घेण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष गोविंद बिशेन गूजरात प्रदेश अध्यक्ष सुनील गामीत,संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बिशप ओमकार, प्रदेश सचीव रमेश गावीत ,नंदूरबार जिल्हाध्यक्ष रमेश पाडवी, डांग जिल्हाध्यक्ष सूरेश माहला ,मूबंई वेस्टर्न अध्यक्ष डॉ. चद्रशेखर ,डॉ डिसूजा, भरूच जिल्हाध्यक्ष संदिप बरगडे आदी व मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.