पुणे : सावळ्या परब्रम्हाच्या भेटीसाठी पंढरीच्या वाटेवर असलेल्या लाखो वैष्णवांच्या संगतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी दिवे घाटातील अवघड टप्पा लीलया पूर्ण केला. पालखी सासवडला मुक्कामी पोहोचली. त्यावेळी सासवडकरांनी जोरदार स्वागत केले. दरम्यान, माऊली व तुकोबांच्या पालख्या पुणेकरांचा पाहूणचार घेऊन मंगळवारी सकाळी शहरातून मार्गस्थ झाल्या. पुणेकरांनी या दोन्ही संतांना भावपूर्ण निरोप दिला.