जळगाव । स्वातंत्र्य मिळुन 7 दशके उलटली मात्र अद्यापही समाज हा विषमतेच्या गर्तेत अडकला आहेत. महापुरुषांनी आपल्या संपुर्ण जीवन सामाजाच्या विकासासाठी अर्पण केले. त्यात श्री छत्रपती शाहू माहाराज हे एक होते. महाराजांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी खुप प्रयत्न केले. जाती भेद नष्ट झाल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही. जाती भेद हे समाज विकासातील महत्वाची अडचण असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. सामाजिक न्याय, विशेष सहाय्यक विभाग व सामाजिक न्यायदिन जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
बिस्कीट व पाणी पाऊच वाटप
संस्थेचा वापर कसा करावा हे शाहू महाराजाकडून शिकावे. स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहत आणने खुप कठिण होते. परंतु सर्वांना शिक्षणाचा हक्क महाराजांनी मिळवून दिला. सर्वांना समान छता खाली आणले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाता कोणतीही समस्या आल्यास जिल्हा परिषद स्थरावर सोडविल्या जाईल. विद्यार्थ्यांनी कोणतेही न्युनगंड न-बाळगता अभ्यास करा असा सल्ला सीईओंनी दिला. सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थ्यांनाना पाणी पाउज व बिस्कीट वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या या अध्यक्षस्थानी समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकल्याण विभागाचे कर्मचार्यांनी परिश्रम घेतले सुत्रसंचान लन विनोद ढगे यांनी तर आभार समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड यांनी मानले.जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपसीईओ राजन पाटील, समाजीक न्याय कल्याणचे सहय्यक आयुक्त गायकवाड, प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे, प्रमुख वक्ते अ.फ. भालेराव, कृषी अधिकारी मधुकर चौधरी, बी.आर. पाटील, समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड आदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विनोद ढगे यांच्या पथनाटकाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आहे.