जातीयवादी राजकारण करण्यावर सत्ताधार्‍यांचा भर – अजित पवार

0

हडपसर : विकासकामांना प्राधान्य देण्याऐवजी निवडणूक समोर ठेवून सत्ताधारी युती सरकार जातीयवादी राजकारण करण्यावर भर देत असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सय्यदनगर येथे बोलताना केली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक फारूक इनामदार यांनी राज्यस्तरीय हडपसर व्हॉलीबॉल चषक स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी पवार हे बोलत होते. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, वैशाली बनकर, निलेश मगर, योगेश ससाणे, नगरसेविका हेमलता मगर, नंदा लोणकर, अशोक कांबळे, सचिन तुपे, आबासाहेब कापरे, सागर भोसले, हाजी गफूरभाई पठाण, नारायण लोणकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

लोकांना परिवर्तनाची गरज

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शरद पवार साहेबांचा वाढदिवस यंदा साजरा न करता शेतकरी बांधवांना मदत करण्याचे आवाहन पक्षाने केले आहे. शरद पवार यांनी देशाच्या क्रीडा क्षेत्राला दिशा देण्याचे काम केले आहे. फारूक इनामदार यांनी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करून गुणवंत खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. देशातील जनता भाजप सत्ताधार्‍यांना कंटाळून गेली आहे. महागाई, नोटबंदी, जीएसटीमुळे सर्वच स्तरांमधील लोकांना आता परिवर्तन हवे आहे. त्यामुळे सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध शहरे आणि जिल्ह्यामधून 40 संघ सहभागी झाले. यावेळी राष्ट्रीय खेळाडूंना सन्मानीत करण्यात आले. स्पर्धेचे संयोजन सुफियान इनामदार व कार्यकर्त्यांनी केले, प्रणयराजे भोसले यांनी आभार मानले.