मुंबई (रोहीत पोखरकर) : मागासवर्गीय जातींमधील स्रिया व मुलांवरील अत्याचार रोखण्याच्या उध्दीष्टाने, 30 जुन रोजी भालचंद्र मुनगेकर यांच्या नेत्रुत्वाखाली एका निषेध मोर्चाचे आयोजन आझाद मैदान येथे केले होते. गो हत्या बंदी ह्या कायद्यामध्ये सुधारणा करवण्यात याव्या, तसेच मागासवर्गियांची पिळवणुक थांबावी, व ज्या जुनेद, मेहमुद, मोहम्मद खान यांचा गो हत्ये प्रकरणी बळी गेला आहे. या बळी गेलेल्या प्रत्येकाला न्याय मिळावा व राधीका उंबरकर या बुलढाण्यातील मागासवर्गिय स्रिला तिचा न्याय मिळावा अशा विविध मागण्यांसाठी ह्या मोर्चाचे आयोजन केले होते.
मुंबईत झालेल्या एक दिवसीय निषेधानंतर संपुर्ण मुंबईत व नंतर संपुर्ण महाराष्ट्रात हा मोर्चा नेणार असल्याचे व्यवस्थापण कमीटी ने सांगितले. तसेच बुलढाण्यातील बलात्कार पिडीत महीलेला निदान 25 कोटी मिळाले पाहीजे याची देखील मागणी ह्या मोर्चा मध्ये करण्यात आली. तर जुनेद खान या नवतरुणाच्या घरच्यांना देखील योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी सुध्दा मागणी येथ करण्यात येत होती. सरकार वर अारोप करताना आयोजक व पुर्व राज्य सभेचे एम पी भालचंद्र मुनगोकरांनी सांगितले, कि सतत चे होणारे मागासवर्गीयांवरील अत्याचार कमी होण्यासाठी जे अत्याचार करतात त्यांना शिक्षा होण्यासाेठी आजचे निदर्शन आहे. या मागील 3 ते 4 वर्षांपुर्वी पासुन मागासवर्गियांवरील अत्याचार वाढत आहेत. तसेच त्या स्र्तीयांवरील बलात्काराचे प्रमान कमी होत नाही. यासाठी या निदर्शनांचा घाट घालण्यात आला आहे. मुस्लीम, ख्रीचन, शीख अशा कोणत्याही समाजावर अन्याय होवु नये यासाठी हा लढा आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि बीजेपी च्या मनमानी कारभारामुळे मागास वर्गीयांवरील अत्याचारात वाढ झाली अाहे. एकुन 14 राज्यांहुन अधिक असणार्या बी जे पी च्या राज्यांमध्ये असे अत्याचाराचे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत. त्याच बरोबर राजस्थान मध्ये प्रत्येक दिवशी 2 मागासवर्गीयांच्या हत्या होत आहेत. त्यामुळे येथे लोकांनी जाग्रुत व्हायची गरज असल्याचे सांगितले आहे. पुढे ज्या 25 संघटना आहे. त्या महाराष्ट्रातील 25 संघटनांचे प्लँटफाँर्म करुन संविधान संरक्षक क्रुती समिती तयार करण्याचा विचार असुन सध्याचा निषेध मोर्चाचे संपुर्ण भारतात जनआंदोलन करण्याचा प्रयत्न असणार अाहे. निषेधापर या मोर्चात विविध अशा 25 संघटनांचा सहभाग होता. ज्यात मुस्लीम लीग, मौलाना आझाद विचार मंच, दलित पँथर, अश्या संघटना व काँग्रेस पक्षातील काही अधिकारी व ज्येष्ट पत्रकार युवराज मोहीते देखील या मोर्चा मध्ये सहभागी झाले होते.