भुसावळ। रमजान हा शांतीचा संदेश देणारा सण आहे. या काळात मुस्लीम बांधव आपले रोजे ठेऊन उपासना करीत असतात. यातून आपल्या सर्वांगिण विकासाला देखील हातभार लागत असतो. भुसावळ शहरात हिंदू मुस्लीम समाजबांधव एकत्र गुण्यागोविंदाने राहून एकमेकांचे सण उत्सव साजरे करीत असल्यामुळे शहरात कुठलीही जातीय तणाव निर्माण झाला नाही. त्यामुळे हा सलोखा टिकून राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. येथील एम.आय. तेली इंग्लिश स्कुल व पोलीस प्रशासनातर्फे रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आमदार एकनाथराव खडसे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराडे, अप्पर पोलीस अधिक्षक बच्चनसिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसिलदार मिनाक्षी राठोड, परिवेक्षाधीन अधिकारी मनिष कलवानी, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, अनिल चौधरी, विजय चौधरी, रमेश मकासरे, जलील कुरेशी, हाजी गफ्फार मलिक, हाजी मुन्ना तेली आदी उपस्थित होते. याप्रसंगी ईश्वराकडे दुवा मागण्यात येऊन रोजा सोडण्यात आला.