जातीय सलोखा नांदण्यासाठी कायद्याचे पालन करा

0

निंभोरा । जातीय सलोखा कायदा व सुव्यवस्था शांतता नांदावी या करता प्रत्येक नागरीकाने कायद्याचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे केले. ग्रामोद्योग सेवा करणारे टपरीधारक न्हावी, धोबी, शिंपी यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना त्यांनी पुढे असे सांगितले की, पोलिससुद्धा एक माणूस असून तो खाकी वर्दीतला एक कार्यकर्ता आहे.

नियमांचे पालन करणार
यावेळी त्यांच्या सत्काराला उत्तर देतांना सामाजिक कार्यकर्ता काशिनाथ शेलोडे यांनी आपल्या मनोगतात त्यांचे आभार मानून असे सांगितले की, तुम्ही आमच्या विनंतीला मान देवून येथे आलात व आमचा सत्कार स्विकारला तसेच तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही सर्व ग्रामोद्योग सेवा करणारे व्यावसायिक आपल्या नियमाचे पालन करुन कायदा सुव्यवस्था शांतता राखण्यास सहकार्य करु, असे आश्वासन दिले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रास्तविक सुत्रसंचालक योगेश बोरनारे व आभार राजेश सावळे यांनी मानले. यावेळी काशिनाथ शेलोडे, सरपंच डिगंबर चौधरी, दुर्गादास पाटील, राजीव बोरसे, कडु चौधरी, विजु सोनार, आरिफ खान, सचिन महाले, रवी महाले, पंडीत चिमनकारे, अंबादास शिंपी, नारायण टेलर, रविंद्र टोगे, लाला पटेल, मन्सुर पिंजारी, अण्णा मोरे, गिरडे टेलर यांनी उपस्थिती दिली. कार्यक्रमाकरिता परिश्रम अशोक मालखेडे व सुभाष ठाकरे यांनी केले.