सावदा । नवरात्रोत्सव आणि मोहरमच्या एकाच वेळी असल्यामुळे दोन्ही समाजबांधवांनी गुण्यागोविदांने उत्सव साजरे करण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी केले. शांतता समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले. यावेळी त्यांनी गणेशोस्तवाप्रमाणे आगामी सण देखील शांततेत साजरे होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारी सुभाष नेवे, फैजपूर उपविभागीय अधिकारी राजेंद्र रायसिंगे, सावदा नगराध्यक्षा अनिता येवले, फैजपूर नगराध्यक्षा महानंदा होले, सावदा उपनगराध्यक्षा नंदा लोखंडे, शामला सरोदे, मुख्याधिकारी अमोल बागुल, बाजार समिती सदस्य पंकज येवले, सय्यद अजगर, नगरसेवक राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी यांसह आजी माजी नगरसेवक, शांतता समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्षा नंदा लोखंडे, राजेंद्र चौधरी, राजेंद्र रायसिंगे, आदींनी मनोगत व्यक्त केले.