जातीय हिंसाचारामध्ये 41 टक्क्यांनी वाढ

0

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात देशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये 41 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी संसदेत दिली. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा (एनसीआरबी) अहवाल सादर करत अहिर यांनी सांप्रदायिक आणि जातीय हिंसाचाराच्या वाढत्या आकडेवारीची माहिती दिली.

हिंसाचाराच्या 336 घटना
कथित गोरक्षकांच्या हिंसेवरील प्रश्नाला उत्तर देताना अहिर यांनी ही आकडेवारी सादर केली. मात्र आपल्याकडे गोरक्षकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराबद्दल कोणतीही आकडेवारी नसल्याचे अहिर यांनी सांगितले. गृहराज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले की, 2014 मध्ये धर्म, जात आणि जन्मस्थान यावरुन हिंसाचाराच्या 336 घटना घटना घडल्या. 2016 या वर्षात ही संख्या वाढून थेट 475 वर जाऊन पोहोचली.