रॉबर्ट्सगंज : लोकसभा निवडणुक अंतिम टप्प्याती येऊन ठेपली आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. तत्पूर्वी राजकारण अधिकच तापले आहे. राजकीय नेते मंडळी एकमेकांचे जात काढण्या पर्यंत हा विषय गेला आहे. बसपा प्रमुख मायावती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील जातीय टीका सुरुच आहे. खालच्या जातीचे असते तर मोदींना संघाने पंतप्रधानच केले नसते, या मायावतींच्या टीकेवर मोदींनी प्रत्त्युत्तर दिले आहे. देशातील गरिबांची जी जात असेल तीच जात माझी असल्याचे उत्तर मोदी यांनी दिले आहे.
मायावतीने जातीवरून टीका केल्याने, मी स्पष्ट करू इच्छितो की माझी जात ही देशातील गरिबांची जी जात आहे तिच आहे, असे मोदी म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल जर देशाचे पंतप्रधान असते तर शेतकऱ्यांची स्थिती चांगली असली असती. मात्र, आम्ही पटेलांचा पुतळा उभा केला त्यालाही या लोकांचा विरोधा असल्याची टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.