जात पडताळणीसाठी महिलांचा उपोषणाचा इशारा

0

नंदुरबार । जातपडताळणी करून देण्याचे आश्‍वासन देऊनही प्रक्रिया पूर्ण न करणार्‍या नंदुरबार येथील जातपडताळणी समितीचे सहआयुक्त यांच्या निषेधार्थ जागतिक महिला दिनाच्या दिवशी टोकरे कोळी समाजातील महिला कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत, या बाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना आदिवासी कोळी समाज संघटनेचे पदाधिकारी हेमलता बागुल, प्रमिला कोळी, नामदेव येळवे, सुकलाल कोळी, डॉ. राजेंद्र सावळे, आनंद कोळी आदी उपस्थित होते.

हजारो प्रस्ताव प्रलंबित
नंदुरबार येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी कार्यालयात आदिवासी टोकरे कोळी जमातीचे हजारो प्रस्ताव प्रलंबित आहेत. मात्र या कार्यलयातील अधिकारी जात पडताळणी प्रमाण पत्र देण्यास दुजाभाव करीत असल्याचा आरोप आदिवासी टोकरे कोळी जमातीने केला आहे, या मागणीसाठी 18 डिसेंम्बर रोजी प्रमिला आनंदा कोळी या वृद्ध महिलेसह समाजातील पदाधिकारी आमरण उपोषणाला बसले होते. त्यावेळी समितीच्या सह आयुक्त बबिता गिरी यांनी आठ दिवसात जात पडताळणी करून देण्याचे लेखी आश्‍वासन दिलं होतं, परंतु दोन महिने उलटून देखील आयुक्तांनी पुढील प्रक्रिया अपूर्ण ठेवली आहे,यामुळे त्या वृद्ध महिलेच्या नातवाच्या शिक्षणासाठी अडचणी येत आहेत, त्यामुळे पुन्हा आमरण उपोषण बसण्याचा इशारा देण्यात आला आहे, याबाबत सह आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कोळी ढोर, टोकरे कोळी,महादेव कोळी,जमातीचे असून सवलतीचा लाभ घेण्याचा संविधानिक हक्क आहे, असे असतांना समितीचे अधिकारी या संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवत आहेत,या घटनेच्या निषधार्थ 8 मार्च या महिला दिनाच्या दिवशी आम्ही शेकडो महिलांसह पुरुष नंदुरबार येथील जातपडताळणी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.