जळगाव- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांचेवतीने सेवा व निवडणूक विषय जात दावा प्रस्तावाबाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. संबंधित मागासवर्गीय उमेदवारांना कळविण्यात येते की, आपापल्या प्रकरणांमध्ये असलेली त्रुटी सेवा प्रकरणे दिनांक 11 व 12 ऑक्टोबर, 2018 रोजी व निवडणूक प्रकरणे दिनांक 15 व 16 ऑक्टोबर, 2018 रोजी समक्ष कार्यालयात येवून त्रुटी सादर करावी. असे जिल्हा जातपडताळणी समितीचे उपआयुक्त तथा सदस्य यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
तसेच त्रुटी पुर्तते बाबतची लेखी नोटीस यापुर्वीच संबंधित उमेदवारांना पोस्टाव्दारे कळविण्यात आलेली आहे. ज्यांनी या अगोदर त्रुटी पुर्तता केलेली आहे. अशा उमेदवारांनी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. निवडणूक व सेवा विषयक प्रकरणांमध्ये त्रुटीबाबत संबंधितांना वारंवार कळविण्यात येवूनही त्रुटी पुर्तता न केल्यास प्रकरण निकाली काढण्यात येईल असेही उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी कळविले आहे.